Malad SRA Project : मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेल्याने एकाचा मृत्यू

332
Thane News : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे १६ वर्षीय मुलीचा मृत्यू; नातेवाईक आक्रमक

मालाड (पूर्व) येथे पश्चिम द्रुतगती मार्ग येथील प्रताप नगर येथे समुद्र बार रेस्टॉरंटच्या मागे सुरू असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) अंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्प कामात खोदलेली माती अंगावर पडून गाडले गेल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला आहे, तर एका कामगारावर उपचार करून त्याला घरी सोडण्यात आले आहे. (Malad SRA Project)

मालाड (पूर्व) येथे पश्चिम द्रुतगती मार्ग येथील प्रताप नगर येथे समुद्र बार रेस्टॉरंटच्या मागे सुरू असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) अंतर्गत इमारतीच्या बांधकाम अॅमीटी कंन्स्ट्रक्शनच्या वतीने हाती घेण्यात आले. या इमारत पुनर्विकास प्रकल्प अंतर्गत खोदण्यात आलेल्या खड्यामधून बाहेर काढण्यात आलेली माती शुक्रवारी दीडच्या सुमारास पावसामुळे पुन्हा खड्यामध्ये घसरली गेली. त्यामुळे या मातीच्या ढिगाऱ्याखाली ३ कामगार अडकले गेले. (Malad SRA Project)

(हेही वाचा – BMC वर कर्ज घेण्याची येणार वेळ, रवी राजा यांनी अशी का व्यक्त केली भीती)

अडकलेल्या तीन कामगारांपैकी दोन कामगारांना उपचारार्थ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात दाखल करण्यात आले व एकास डॉ. बाबासाहेब हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयातून आंबेडकर रुग्णालय, कांदिवली येथे पाठविण्यात आले होते. रुग्णालयातील डॉक्टरांच्या माहितीनुसार, दोन कामगारांपैकी प्रेमचंद जैस्वाल (३९ वर्षे) यांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. तर संजय कुसा, (३२ वर्षे) हा किरकोळ जखमी असल्यामुळे त्याला उपचार करुन घरी पाठविण्यात आले. (Malad SRA Project)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.