लादेनचा जवळचा सहकारी Terrorist Amin ul Haq ला अटक

132
लादेनचा जवळचा सहकारी Terrorist Amin ul Haq ला अटक

पाकिस्तानमधील अल कायदाचा म्होरक्या आणि ओसामा बिन लादेनचा निकटवर्तीय अमिन-उल-हक याला अटक करण्यात आली आहे. पंजाबच्या दहशतवादविरोधी विभागाने (CTD) शुक्रवारी ही माहिती दिली. (Terrorist Amin ul Haq)

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, सीटीडीला अल कायदाचा वरिष्ठ कमांडर अमीन-उल-हक गुजरात (पाकिस्तान) मधील सराय आलमगीर शहरात असल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर त्यांनी ऑपरेशन केले आणि त्याला अटक केली. (Terrorist Amin ul Haq)

अमीन उल हक हा अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या असून त्याचा संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिबंध यादीत समावेश आहे. शिवाय अमीन हा ९/११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड मृत ओसामा बिन लादेन याचा जवळचा सहकारीही होता. (Terrorist Amin ul Haq)

(हेही वाचा – राजकीय गोष्टींवर चर्चा करण्याची आमची परंपरा नाही; अमेरिकेचे राजदूत Eric Garcetti यांना भारताचे सडेतोड उत्तर)

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील दहशतवादविरोधी विभागाने (CTD) अमीन उल हकच्या विरोधात कायदेशीर खटला नोंदवला आहे. पंजाबमधील महत्त्वाच्या प्रतिष्ठानांची तोडफोड करण्याची योजना आखल्याचा आरोप करत त्याला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानकडून अनेक वर्षांनंतर अल-कायदाच्या सदस्याला अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या अंतर्गत (गृह) मंत्रालयाने अद्याप यावर काहीही टिप्पणी केलेली नाही. (Terrorist Amin ul Haq)

अमीन हा ओसामा बिन लादेनचा जवळचा सहकारी असल्याचे सीटीडीच्या प्रवक्त्याने सांगितले. संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी यादीतही त्याचे नाव समाविष्ट आहे. अमेरिकेने २००१ मध्ये जागतिक दहशतवाद्यांची यादी जाहीर केली होती ज्यात अमीनचे नाव होते. (Terrorist Amin ul Haq)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.