Maharashtra Rain : मुसळधार पावसामुळे मुंबई लोकलसेवा विस्कळीत! हार्बर रेल्वे १५ मिनिटे तर मध्य, पश्चिम रेल्वे १० मिनिटं उशिराने

143

राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र या भागासाठी मुंबई, मुंबई उपनगर, पुणे यासारख्या भागात पावसाने (Maharashtra Rain) जोर धरला आहे. मुंबई, उपनगरांत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक (Mumbai Local) उशिराने सुरू आहे. तर, कल्याण डोंबिवलीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. बदलापुरात मुसळधार पाऊस सुरू आहे.

(हेही वाचा –Kawad Yatra 2024 : उत्तर प्रदेशनंतर उत्तराखंडमध्येही विक्रेत्यांना नावाची पाटी अनिवार्य)

मुंबईसह परिसरात पडत असलेल्या पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य व पश्चिम रेल्वे ५ ते १० मिनिटं उशिराने तर, हार्बर रेल्वे १० ते १५ मिनिटं उशिराने धावत आहेत. (Maharashtra Rain)

(हेही वाचा –PM Narendra Modi यांनी मन की बात कार्यक्रमासाठी मागवल्या सूचना)

हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. काही भागात मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, आजही हवामान विभागानं राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. (Maharashtra Rain)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.