नागपूरच्या (Nagpur) जोरदार पावसामुळे (Rain Update) नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमधील शाळा आणि कॉलेजला सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी विपीन ईटनकर यांनी घेतला आहे. तर वाढत्या पावसामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले
नागपूरमध्ये गेल्या दोन तासांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. नागपूरमधील अनेक सखल भागात पाणी शिरले आहे. तसेच ज्या परिसरात नवीन काँक्रिटीकरणाचे काम झाले आहे त्या परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. तसेच नाग नदीच्या संरक्षक भिंत अनेक ठिकाणी खचली होती. या भिंतीच्या डागडुजीचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरु होते. मात्र आता या ठिकाणाहून पाणी यायला लागेल, अशी भीती व्यक्त होत आहे. (Rain Update)
अलर्ट जारी…
विदर्भात आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रपूरला (Chandrapur) आज रेड अलर्ट (Red Alert) देण्यात आलेला आहे. तर नागपूर (Nagpur), गडचिरोली (Gadchiroli), वर्धा (Wardha), अमरावती (Amaravati) या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. (Rain Update)
गडचिरोली जिल्ह्यात हवामान खात्याने 48 तास अतिवृष्टीचा इशारा दिला होता. आज जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस सगळीकडे पडत आहे. सध्या मुख्य मार्ग सुरळीत सुरू आहे. काल जिल्ह्यात एकूण सरासरी 52.0 मिमी पावसाची झाले आहे. काल जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस 40 पैकी 13 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून सिरोंचा तालुक्यातील सिरोंचा मंडळामध्ये सर्वाधिक 270.8 मिमी पावसाची नोंद झाली. त्यापैकी सिरोंचा मुख्यालयी 184 मिमी पाऊस कोसळला आहे. (Rain Update)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community