Kia Sportage : कियाची नवीन क्रॉसओव्हर सी सेगमेंट एसयुव्ही आली जगासमोर 

Kia Sportage : किया स्पोर्टेज गाडी ही कियाची सगळ्यात खपणारी कार आहे

331
Kia Sportage : कियाची नवीन क्रॉसओव्हर सी सेगमेंट एसयुव्ही आली जगासमोर 
Kia Sportage : कियाची नवीन क्रॉसओव्हर सी सेगमेंट एसयुव्ही आली जगासमोर 
  • ऋजुता लुकतुके

किया मोटर्स कंपनीला ३० वर्षांचा इतिहास आहे. या कालावधीत कंपनीची सगळ्यात जास्त खपलेली एसयुव्ही आहे. मध्यम श्रेणीतील आणि ५ जण बसू शकतील अशी किया स्पोर्टेज. कंपनीने या गाडीचं नावही कधी बदललेलं नाही. दर काही वर्षांनी या मॉडेलचं आधुनिक फेसलिफ्ट मॉडेल नियमितपणे बाजारात येतं. यावेळी असंच आधुनिक मॉडेल रस्त्यावर फिरताना दिसलं आहे. त्यामुळे किया स्पोर्टेजची नव्याचे चर्चा सुरू झाली आहे. (Kia Sportage)

(हेही वाचा- Rain Update : विदर्भात मुसळधार पाऊस! नागपूरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर)

आता ट्रायल सुरू असली तरी ते लाँच होईल २०२५ मध्ये असंच दिसतंय. गाडीचं डिझाईन हे किया ईव्ही ९ किंवा किया सोरेंटोशी मिळतं जुळतं आहे. निदान पुढची बाजू आणि हेडलाईट हे या गाड्यांसारखे दिसत आहेत. कियाचा नवीन लुक हा जास्त आक्रमक आणि थोडा अवजड गाडीचा असतो तसा आहे. गाडीची चाकं ईव्ही ३ प्रमाणे पैलू पाडलेल्या हिऱ्याप्रमाणे दिसतात. या गाडीविषयी अधिक माहिती खालील व्हीडिओत तुम्ही पाहू शकता. (Kia Sportage)

 जुन्या स्पोर्टेज कारच्या तुलनेत गाडीचा बंपर आणि मागची बाजू यांची रचना आणि आकार बदलला आहे. नवीन आकार हा जास्त आकर्षक आणि तरुणांना आवडेल असा आहे. कियाच्या नवीन गाड्यांप्रमाणेच या गाडीतही मुख्य आकर्षण आहे तो मोठ्या आकाराचा म्हणजे १२.३ इंचांचा मोठा डिस्प्ले. विशेष म्हणजे गाडीत तीन डिस्प्ले असतील. चालकाच्या सुरक्षेसाठी आधुनिक सुरक्षा यंत्रणा असेल. तर क्लायमॅट कंट्रोलची सोयही गाडीत आहे. (Kia Sportage)

(हेही वाचा- Jammu and Kashmir मध्ये ५०० स्पेशल पॅरा कमांडो तैनात; ५०-५५ पाकिस्तानी दहशतवादी असल्याचा संशय!)

निदान परदेशात ही कार हाय-ब्रीड असेल. पेट्रोल आणि इलेक्ट्रिक अशा दोन प्रकारात ही गाडी असेल. पेट्रोल व्हर्जनचं इंजिन हे १.६ टर्बो इंजिन असेल. या गाडीची भारतातील किंमत २१ लाख रुपयांच्या आसपास असेल. (Kia Sportage)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.