- ऋजुता लुकतुके
मायक्रोसॉफ्ट या जगातील एके काळच्या नंबर वन कंपनीचा सर्व्हर शुक्रवारी काही काळासाठी बंद झाला होता. त्यामुळे युरोप, अमेरिकेसह अनेक देशांमध्ये विंडोजवर चालणारे संगणक, फोन आणि इतर यंत्र बंद पडली. विमान कंपन्या, वित्तीय संस्था आणि कॉर्पोरेट ऑफिसच्या यंत्रणा विंडोज् सर्व्हरवर चालत असल्यामुळे सगळीकडे काम ठप्प झालं. संगणकावर फक्त एक निळी स्क्रीन दिसत होती. काहीजणांचे संगणक रिस्टार्ट होऊ लागले. तर काही शटडाऊन झाले. (Anand Mahindra on Microsoft Outage)
(हेही वाचा- नागपूरमध्ये मुसळधार! उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis ट्विट करत म्हणाले…)
काम ठप्प झाल्यावर सोशल मीडियावर मिम आणि मजेशीर फोटोंचा पाऊस पडला. यातील भारतीय उद्योजक आनंद महिंद्रा यांच्या एका फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. या फोटोत दोन शस्त्रधारी सैनिक म्हशींवर बसले आहेत. युद्धाला निघाल्याच्या अविर्भावात आहेत. महिंद्रा खाली लिहितात, ‘जागतिक व्यापार आणि उलाढालींचा वेग हा असा मंदावला आहे. हे सगळं मायक्रोसॉफ्ट बंद पडल्यामुळे झालंय.’ (Anand Mahindra on Microsoft Outage)
The pace of global commercial activity right now—post the #microsoft #crowdstrike outage…. pic.twitter.com/lwDmJaHI8T
— anand mahindra (@anandmahindra) July 19, 2024
महिंद्रा यांचं हे ट्विट लगेचच व्हायरल झालं. लोकांच्या त्यावर प्रतिक्रियाही सुरू झाल्या. एक वाचक म्हणतो, ‘आपण संगणक आणि डिजिटल चलनावर किती अवलंबून आहोत, हे यामुळे सिद्ध झालं.’ तर दुसऱ्या एका वाचकाने मार्मिक टिपण्णी केली आहे. ‘काही कंपन्यांकडे मक्तेदारी असेल तर काय समस्या येऊ शकतात हे आज कळलं. काही निवडक टेक कंपन्यांच्या हातात सगळे व्यवहार आहेत, म्हणून असं घडलं’ (Anand Mahindra on Microsoft Outage)
(हेही वाचा- Suryakumar Yadav : सूर्यकुमारला कप्तानी फारशी कठीण का वाटत नाही?)
मायक्रोसॉफ्ट कंपनीने हा सायबर हल्ला किंवा सुरक्षा भेदण्याचा प्रकार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच विंडोज् अपडेटमध्ये असलेल्या फाल्कन सेन्सरमुळे सर्व्हर बंद पडल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. ४ ते ५ तासांनी कंपनीने यावरील उपाय सुचवला. मग विंडोज प्रणाली पूर्ववत सुरू झाली. (Anand Mahindra on Microsoft Outage)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community