मुंबईतील ग्रँड रोड (Grant Road) स्टेशन परिसरातील चार मधली इमारतीचा काही भाग कोसळला आहे. सकाळपासून मुंबईसह उपनगरांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पहाटेपासून सुरू असलेल्या पावसाने अनेक सखल भागात ठिकाणी पाणी साचलं आहे. याच पावसाचा फटका सामान्य मुंबईकरांनाही बसला आहे. थोड्या वेळापूर्वी ग्रँड रोड स्टेशन परिसरातील इमारतीचा भाग कोसळला आहे. ही इमारत बरीच जुनी आहे.
(हेही वाचा –शेतकऱ्याला धमकावताना वापरलेली Manorama Khedkar यांची कार जप्त!)
काही लोक आतमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी व फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून कर्मचाऱ्यांकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. मध्ये चार जण अडकल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेचे अधिकारी व अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. (Grant Road)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community