नागपूरमध्ये मुसळधार! उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis ट्विट करत म्हणाले…

112
नागपूरमध्ये मुसळधार! उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis ट्विट करत म्हणाले...
नागपूरमध्ये मुसळधार! उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis ट्विट करत म्हणाले...

नागपूर (Nagpur) शहरात शनिवार सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागपूर मधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. हवामान विभागाने अर्थात आयएमडीने नागपुरात ऑरेंज अलर्ट जारी केला असल्याची माहिती नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी दिली आहे. (Devendra Fadnavis)

मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित

याच पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विट केलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नागपूर शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. मी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात असून स्वतः जिल्हाधिकारी शहराचा दौरा करीत आहेत. शाळांना सुटी देण्यात आली असून ज्या सखल भागात पाणी शिरले तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

‘परिसरात काही रस्ते बंद झाले आहेत. नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. नागपूर विभागात सुद्धा गडचिरोलीतील काही भागांचा संपर्क तुटला आहे. विभागीय आयुक्त सातत्याने सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्कात आहेत. त्यांनाही सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्यास सांगण्यात आले आहे.’ असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.