Nagpur Rain Update: नागपूरात मुसळधार पाऊस; रेल्वेस्थानकाला आले नदीचे स्वरूप

167
Nagpur Rain Update: नागपूरात मुसळधार पाऊस; रेल्वेस्थानकाला आले नदीचे स्वरूप
Nagpur Rain Update: नागपूरात मुसळधार पाऊस; रेल्वेस्थानकाला आले नदीचे स्वरूप

नागपूरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असून, अनेक सखल भागात पाणी साचले आहे. परिणामी नागपूरात पावसाचा जोर पाहता शाळा-महाविद्यालयांना सुट्टी घोषित करण्यात आली आहे. हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट (Nagpur Orange Alert) जारी केला होता व पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच अतिवृष्टीमुळे रस्त्यावरचे पाणी चक्क रेल्वे स्थानक आणि रेल्वे ट्रॅक वर शिरले. परिणामी रेल्वे ट्रॅकला नदीचे स्वरूप आले आहे. दरम्यान, रेल्वे ट्रॅक (Nagpur Railway Track) पाण्याखाली गेल्यामुळे वेगवेगळ्या भागातून येणाऱ्या रेल्वे गाड्या नागपूर शहराबाहेर आऊटरला थांबविण्यात आल्या आहेत. (Nagpur Rain Update)

(हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहलीने गंभीरच्या नियुक्तीनंतर बीसीसीआयला काय सांगितलं?)

दरम्यान, रेल्वे प्रशासनाने यावर्षी संभाव्य स्थितीचा आढावा घेऊन मान्सूनपूर्व उपाययोजना केल्या होत्या. त्यामुळे रेल्वे ट्रॅक वरचे पाणी लवकर काढण्यात यश आले. त्यामुळे दुपारनंतर गाड्या सुरळीत झाल्या. परंतु, सकाळच्या वेळेत नागपूर स्थानकावर येणाऱ्या आणि येथून सुटणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. काही गाड्या वीस मिनिटे, तर काही गाड्या अर्धा ते पाऊण तास उशिराने नागपुरातून धावू लागल्या. दरम्यान, दूरदूरहून नागपुरात पोहोचू पाहणाऱ्या रेल्वे प्रवाशांचा मोठा कोंडमारा झाला. शहराच्या बाहेर दूर अंतरावर गाड्या येऊन थांबल्या. बाहेर मोठ्या प्रमाणात पाणी सुरू असल्यामुळे प्रवासी गाडीतून खाली उतरून नियोजित ठिकाणी जाऊ शकत नव्हते. त्यामुळे त्यांना रेल्वे स्थानकावर (Nagpur Railway Station) गाड्या पोहोचेपर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे.  (Nagpur Rain Update)

(हेही वाचा – Ratangiri Mansoon Update: रत्नागिरीत तुफान पाऊस; ‘जगबुडी’मुळे संपर्क तुटला! 

उशिरा धावणाऱ्या गाड्या 

ट्रेन नंबर १२७७१ सिकंदराबाद-रायपूर एक्स्प्रेस २० मिनिट उशिरा. १२१०५ सीएसएमटी-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस  १५ मिनिट, १२८५० पुणे-बिलासपूर एक्स्प्रेस १५ मिनिट, १२२९५ बेंगलुरू एक्सप्रेस,  ०१३७४ नागपूर-वर्धा स्पेशल मेमू  ३० मिनिट, २२१३७ नागपूर-अहमदाबाद प्रेरणा एक्स्प्रेस ३० मिनिट,१२४०६ नवी दिल्ली-भुसावळ गोंडवाना एक्सप्रेस २० मिनिट, २२७०६ जम्मू-तिरुपती एक्स्प्रेस ३० मिनिट, १२६८८ चंदीगड एक्सप्रेस ३० मिनिट उशिरा नागपुरातून सुटली. (Nagpur Rain Update)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.