Toyota Belta : टोयोटा यारिस ही सेदान गाडी आता येणार नवीन बेल्टा बनून

Toyota Belta : टोयोटा यारिसला भारतात फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता.

241
Toyota Belta : टोयोटा यारिस ही सेदान गाडी आता येणार नवीन बेल्टा बनून
  • ऋजुता लुकतुके

२०१० च्या दशकात टोयोटा कंपनीने भारतात यारिस ही नवीन सेदान गाडी लाँच केली होती. पण, जुनाट लुक आणि जुनं डिझाईन यामुळे या गाडीला फारसा उठाव मिळाला नाही. अखेर कंपनीने ही गाडी बंद केली. पण, टोयोटा कॅमरी, आल्टिस आणि कोरोला या गाड्या मात्र भारतात कंपनीची ओळख आहेत. आता जुन्या यारिस गाडीला कंपनी नवीन रुपात बाजारात आणत आहे. यावेळी त्यांनी नवीन सेदान गाडीचं नामकरण केलं आहे टोयोटा बेल्टा. (Toyota Belta)

भारतातील टोयोटा कंपनी आणि मारुती सुझुकी यांच्यात पूर्वीच करार झाला आहे. त्यानुसार, मारुती कंपनीची सियाझ ही गाडी टोयोटा कंपनी आफ्रिकेत बेल्टा नावाने विकते. आताही मारुतीच्या कारखान्यातच टोयोटा बेल्टा तयार होणार आहे. त्यामुळे दोन गाड्यांची तुलना होणं अनिवार्य आहे. (Toyota Belta)

टोयोटा कंपनी त्यांच्या प्रिमिअर श्रेणीच्या इंटेरिअरसाठी ओळखली जाते. त्यामुळे आताही बेल्टामध्ये यात फारसा बदल अपेक्षित नाही. डिझाईनही तेच असेल. बदल असेल तो इंजिनमध्ये. (Toyota Belta)

(हेही वाचा – Monsoon Update: मुंबईसह राज्यभर दमदार पाऊस…!)

गाडी ही हाय-ब्रीड असेल आणि यात १.५ लीटरचं पेट्रोल टर्बो इंजिन असेल. १४६२ सीसी क्षमतेचं इंजिन १०३ बीएचपीची शक्ती निर्माण करू शकेल. ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स असलेल्या या गाडीत ४ स्पीडचा ऑटोमॅटिक गिअरबॉक्सही मिळू शकेल. (Toyota Belta)

आपल्या नेहमीच्या विपणन धोरणानुसार, टोयोटा कंपनी बेसिक मॉडेल न काढता मिड-रेंज आणि प्रमिअम अशी दोनच मॉडेल बाजारात आणेल. त्यामुळे टोयोटा बेल्टाची सुरुवातीची किंमतच ९.१६ लाख रुपये असेल. (Toyota Belta)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.