Bangladesh Violence: आंदोलन चिघळलं! मृतांची संख्या १०५ वर; देशात संचारबंदी लागू  

183
Bangladesh Violence : बांगलादेशातील हिंसाचाराचा भारतीय शेतकऱ्यांवर असा होतोय परिणाम?

बांग्लादेशात उसळलेल्या (Bangladesh Violence) हिंसाचाराबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन धगधगत असलेल्या बांग्लादेशात आतापर्यंत १०५ जणांचा मृत्यू झाला आहे. काठ्या, रॉड, दगड घेऊन रस्त्यावर फिरणारे आंदोलक आक्रमक झाल्याने देशातील वातावरण संवेदनशील झाले आहे. शेख हसीना (PM Sheikh Hasina) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या चिंताजनक स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी देशव्यापी संचारबंदी घोषित केली आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लष्कर फौज तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. (Bangladesh Violence)

दरम्यान, पोलीस आणि सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत आतापर्यंत अडीच हजारांहून अधिक आंदोलक जखमी झाले आहेत. तर पोलिसांनीही विद्यार्थ्यांवर लाठीमार आणि अश्रुधुराचा मारा केल्याने वातावरण अधिक गंभीर झालं आहे. देशात इंटरनेट सेवेवर देखील रोख लावण्यात आला आहे.

(हेही वाचा – CM Eknath Shinde यांचा नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा निर्णय, मुलाखतीसाठी शिवसैनिकांच्या रांगा!)

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील या हिंसाचाराबाबत भूमिका जाहीर केली आहे. मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल  (Randhir Jaiswal) यांनी प्रेस ब्रीफिंगमध्ये म्हटले की, हा हिंसाचार बांग्लादेशची अंतर्गत बाब आहे. तत्पूर्वी बांग्लादेशात १५ हजार भारतीय विद्यार्थी असून त्यापैकी ८५०० विद्यार्थी सुरक्षित आहेत. आम्ही तेथील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. देशात परत येऊ इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी भारतीय यंत्रणा स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहे. तर आतापर्यंत १२५ विद्यार्थ्यांसह २४५ भारतीय मायदेशी परतले आहेत. (Bangladesh Violence)

(हेही वाचा – Monsoon Update: मुंबईसह राज्यभर दमदार पाऊस…!)

आरक्षण प्रश्नावरुन विद्यार्थी झाले हिंसक

बांग्लादेशात १९७१ च्या युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या मुलांना सरकारी नोकऱ्यांमध्ये दिले जाणारे आरक्षण रद्द करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन पेटले आहे. २०१८ साली झालेल्या निदर्शनांमुळे शेख हसीना यांनी आरक्षण रद्द केले होते. यातच बांग्लादेशच्या सर्वोच्च न्यायालयानेही आठवड्याभरापूर्वी आरक्षणावर बंदी घातली होती. मात्र, पंतप्रधान शेख हसीना (PM Sheikh Hasina) यांनी अंमलबजावणी होऊ न दिल्याने विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि मेरिटच्या आधारावर नोकऱ्या मिळाव्यात अशी मागणी लावून धरली आहे. ढाकासह इतर मोठ्या शहरांत गेले अनेक दिवस आंदोलनाने हिंसक वळण घेतले असून विद्यार्थ्यांनी रस्ते, महामार्ग अडवलेले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीसारखी मोठी समस्या निर्माण झाली आहे. (Bangladesh Violence)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.