Mumbai Indians Owner : मुंबई इंडियन्स फ्रँचाईजीचे मालक, त्यांची एकूण मालमत्ता, पार्श्वभूमी जाणून घेऊया

Mumbai Indians Owner : मुकेश अंबानी यांनी लग्नाच्या वाढदिवसाची भेट म्हणून ही फ्रँचाईजी नीता अंबानी यांना दिली होती.

138
Mumbai Indians Owner : मुंबई इंडियन्स फ्रँचाईजीचे मालक, त्यांची एकूण मालमत्ता, पार्श्वभूमी जाणून घेऊया
  • ऋजुता लुकतुके

इंडियन प्रमिअर लीग ही देशातीलच नव्हे तर जगातील एक नावाजलेली क्रिकेट लीग आहे. दहा वर्षांतच या लीगने जगभरात आपला ठसा उमटवला आहे आणि खेळाडूंनाही कोट्यवधीची कमाई करून दिली आहे. मुंबई इंडियन्स ही या लीगमधील एक सगळ्यात यशस्वी फ्रँचाईजी आहे. पाचवेळा त्यांनी लीगचं विजेतेपद पटकावलं आहे. मूल्यांकनाच्या बाबतीतही ही फ्रँचाईजी जगात पुढे आहे. (Mumbai Indians Owner)

आता जाणून घेऊया या फ्रँचाईजीच्या मालकांविषयी. इंडियाविन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे या फ्रँचाईजीची मालकी आहे. ही कंपनी रिलायन्स समुहाचीच उपकंपनी आहे. या कंपनीकडे भारतातच नाही तर जगातील अनेक क्रिकेट लीगमधील संघांची मालकी आहे. तसंच फुटबॉलल लीगमध्येही त्यांनी शिरकाव केला आहे. मुकेश अंबानी हे रिलायन्स समुहाचे मालक आहेत. तर स्पोर्ट्स विभाग पत्नी नीता अंबानी आणि मोठा मुलगा आकाश अंबानी सांभाळताना दिसतात. (Mumbai Indians Owner)

पण, कागदोपत्री बघितलं तर मुकेश अंबानी हेच या उपकंपनीचेही एकटे मालक आहेत. तर नीता अंबानी या संचालक आहेत. (Mumbai Indians Owner)

(हेही वाचा – Hording : मोठ्या जाहिरात फलकांबाबत रेल्वे प्रशासनही आजही उदासिनच, सोमवारी होणार कार्यवाहीची दिशा स्पष्ट)

मुकेश अंबानी यांच्याविषयी थोडक्यात,
  • मुकेश अंबानी हे सध्या रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा आणि प्रमुख आहेत. ते आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक आहेत. आणि त्यांची एकूण मालमत्ता ६.७ लाख कोटी रुपये इतकी आहे.
  • गुजराती हिंदू कुटुंबात त्यांचा जन्म झाला असून ते धीरूभाई आणि कोकिलाबेन अंबानी यांचे ज्येष्ठ सुपुत्र आहेत. त्यांना अनिल अंबानी हा छोटा भाऊ आहे आणि दोन बहिणीही आहेत.
  • १९८१ पासून ते रिलायन्स इंडस्ट्रीजशी जोडले गेलेले आहेत. ही इंडस्ट्री उभी करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे
  • रिलायन्स समुहात पेट्रोकेमिकल, तेल व वायू, रिटेल, मीडिया, दूरसंचार अशा विविध कंपन्या येतात
  • नीता अंबानी यांच्याशी त्यांचं लग्न झालं असून त्यांना आकाश व ईशा ही जुळी मुलं तर अनंत हा आणखी एक मुलगा आहे

रिलायन्स समुहाने २००७ मध्ये इंडियाविन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्थापन केली. आणि २००८ मध्ये आयपीएलसाठी झालेल्या लिलावात त्यांनी मुंबई शहराची फ्रँचाईजी जिंकली. या संघाचं नामकरण त्यांनी मुंबई इंडियन्स असं केलं. त्यानंतर दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि अमेरिकेतील लीगमध्येही त्यांनी फ्रँचाईजी उभ्या केल्या आहेत. (Mumbai Indians Owner)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.