आनंद बक्षी हे एक भारतीय कवी आणि गीतकार होते. त्यांनी आपल्या संगीत कारकिर्दीमध्ये चार वेळा सर्वोत्कृष्ट गीतकाराचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवला होता. त्यांनी तीनशेपेक्षा जास्त चित्रपटांमध्ये सहा हजारांपेक्षा जास्त चित्रपट गीतं लिहिली आहेत. (Anand Bakshi)
आनंद बक्षी यांचा जन्म २१ जुलै १९३० साली ब्रिटीशकाळातल्या भारताच्या पंजाब प्रांतात असलेल्या रावळपिंडी येथे कुलीन मोह्याल ब्राह्मण कुटुंबात झाला. भारताच्या फाळणीनंतर त्यांचं कुटुंब दिल्लीत स्थलांतरित झालं. त्यानंतर ते पुण्यात, मग मेरठ या ठिकाणी राहायला गेलं. पण मग शेवटी आनंद बक्षी यांचं कुटुंब दिल्लीत स्थायिक झालं. (Anand Bakshi)
(हेही वाचा- Guru Purnima 2024 : गुरुंना वंदन करण्याचा पवित्र दिवस – गुरु पौर्णिमा; जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व)
आनंद बक्षी यांना लहानपणापासूनच कविता लिहिण्याची खूप आवड होती. पण त्यांनी हा छंद स्वतः पुरताच मर्यादित ठेवला होता. शिक्षण पूर्ण केल्यानंतर आनंद बक्षी हे भारतीय नौदलात रुजू झाले होते. तिथे त्यांनी गाणी आणि कविता लिहिणं सुरू ठेवलं होतं. पण वेळेच्या अभावामुळे त्यांना अधूनमधूनच लिहायला मिळायचं. पण तरीही जसा वेळ मिळेल तसं त्यांनी कविता लिहिणं सुरू ठेवलं. (Anand Bakshi)
आनंद बक्षी हे नौदलाच्या मनोरंजनपर कार्यक्रमांत त्यांनी स्वतः लिहिलेली गाणी सादर करायचे. त्यांनी अनेक वर्षे नौदलात काम केलं. पण त्याच बरोबर मुंबई चित्रपट विश्वात आपल्या गाण्यांचं मार्केटिंग करण्याचा प्रयत्नही केला. त्यात त्यांना यशही मिळालं. आनंद बक्षी हे हिंदी चित्रपटांमध्ये लेखक आणि गायक म्हणून नाव कमावण्यासाठी आले होते पण गीतकार म्हणून ते जास्त यशस्वी झाले. (Anand Bakshi)
(हेही वाचा- Hardik Pandya : भारतीय संघाचं नेतृत्व गेलं, आता हार्दिकसाठी मुंबई इंडियन्सचं नेतृत्वही दुरापास्त?)
आनंद बक्षी यांच्या पत्नीचं नाव कमला असं होतं. या दाम्पत्याला सुमन दत्त, कविता बाली या दोन मुली आणि राजेश बक्षी, राकेश बक्षी अशी दोन मुलं झाली. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांना हृदय आणि फुफ्फुसाच्या आजारांनी ग्रासलं होतं. मार्च २००२ साली त्यांना नानावटी हॉस्पिटलमध्ये हृदयाच्या शस्त्रक्रियेदरम्यान बॅक्टेरियाचा संसर्ग झाला. त्यामुळे त्यांचे अनेक अवयव निकामी झाले होते. ३० मार्च २००२ साली वयाच्या ७१व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Anand Bakshi)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community