Amit Shah पुण्यात! भाजपाच्या महाअधिवेशनात गृहमंत्री अमित शहा फुंकणार विधानसभेचे रणशिंग

149
Amit Shah पुण्यात! भाजपाच्या महाअधिवेशनात गृहमंत्री अमित शहा फुंकणार विधानसभेचे रणशिंग
Amit Shah पुण्यात! भाजपाच्या महाअधिवेशनात गृहमंत्री अमित शहा फुंकणार विधानसभेचे रणशिंग

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections 2024) अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मेळावे, बैठका, सभा यासह अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच गेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha) आलेली निराशा पुन्हा येऊ नये यासाठी भाजपासह (BJP) मित्रपक्षांनी राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकायला सुरूवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपा नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. रविवारी (२१ जुलै) ते पुण्यात बैठक घेणार असून, अमित शहा (Amit Shah, Pune) विधानसभेचे रणशिंग फुंकणार असल्याचे बोलले जात आहे. या बैठकीसाठी भाजपाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. तर 5 हजार 300 पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. (Amit Shah)

विधानसभा रणनीतीबाबत चर्चा होणार

या बैठकीसाठी शनिवारीच गृहमंत्री शहा पुण्यात दाखल झाले. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) त्यांच्या स्वागतासाठी पोहचले होते. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची ही बैठक बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात (Shri Shiv Chatrapati Sport Complex) आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (Amit Shah)

या बैठकीचे वेळापत्रक असे असणार आहे.

या बैठकीचे वेळापत्रक असे असेल 

(हेही वाचा – Jammu Kashmir Terrorist : 500 पॅरा कमांडो दहशतवाद्यांना कंठस्नान घालणार; लष्कराचे विशेष पथक जम्मूला रवाना

विधानसभेत रंगणार अटीतटीचा सामना

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र तीन अशी राज्य होती जिथं भाजपाला समाधानकारक कामगिरी करता आली नाही. महाराष्ट्रात शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या पक्षफोडीनंतरही भाजपाला चांगले यश मिळाले नाही. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत भाजपाने चांगली कामगिरी केली तर विरोधी मविआला आमदारांच्या बंडखोरीचा फटका बसला. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. (Amit Shah)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.