Sangam Ghat Prayagraj : प्रयागराज इथला संगम घाट एवढा लोकप्रिय का आहे?

204
Sangam Ghat Prayagraj : प्रयागराज इथला संगम घाट एवढा लोकप्रिय का आहे?
Sangam Ghat Prayagraj : प्रयागराज इथला संगम घाट एवढा लोकप्रिय का आहे?

प्रयागराज इथे नद्यांवर शंभरपेक्षा जास्त घाट बांधलेले आहेत. त्यांपैकीच एका घाटाचं नाव आहे ‘संगम घाट’.
गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांचा संगम असलेला ‘संगम घाट’ हा ‘त्रिवेणी संगम’ म्हणूनही ओळखला जातो.

का म्हणतात संगम घाट?

प्रयागराज येथील संगम या घाटावर गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन पवित्र नद्यांचा संगम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. या तीन नद्यांच्या संगमामुळे हिंदू पौराणिक कथांमधील हे एक दैवी स्थान गणलं जातं. हिंदू धर्मातल्या तीन प्रमुख देवतांपैकी भगवान ब्रह्मदेवांनी संगम घाटावर यज्ञ केला होता, असं मानलं जातं. (Sangam Ghat Prayagraj)

पापांपासून मिळते मुक्ती

प्रयागराजमधलं संगम घाट (Sangam Ghat Prayagraj) हे एक शांत ठिकाण आहे. इथे प्रसिद्ध कुंभमेळा भरवला जातो. या घाटावर गेल्यावर परमात्म्याच्या जवळ गेल्याचा अनुभव येतो. संगम घाट हे सर्व तिर्थक्षेत्रांपैकी एक लोकप्रिय तीर्थक्षेत्र आहे. असं म्हणतात की, त्रिवेणी संगमावर स्नान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते.

(हेही वाचा – Chandrapur Monsoon Update: चंद्रपूरमध्ये पावसाचा रुद्रावतार! शेकडो घरे पाण्याखाली; जनजीवन विस्कळीत )

सुशोभिकरण आणि विकास

उत्तर प्रदेशामध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी तिथल्या सर्व घाटांचं सुशोभीकरणाचं काम सुरू आहे. ज्या वेगाने ही सुशोभिकरणाची कामं सुरू आहेत, त्यावरून असं वाटतं की, लवकरच प्रयागराजही बनारससारखंच घाटांचं शहर म्हणून ओळखलं जाईल. इथल्या घाटांच्या सुशोभिकारणाच्या यादीमध्ये गंगा घाट, यमुना घाट, अरैल घाट, सरस्वती घाट, गौ घाट आणि रसुलाबाद घाट ही नावं सामील आहेत. यांपैकी रसुलाबाद घाट हा प्रमुख घाट आहे. (Sangam Ghat Prayagraj)

एका बाजूला पर्यटनस्थळ तर दुसऱ्या बाजूला स्मशान

तेलियारगंज येथे गंगा नदीच्या काठावर रसूलाबाद घाट बांधलेला आहे. या घाटाचं सौंदर्य पाहण्यासारखं आहे. हा घाट पाहण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडालेली असते. जसं बनारसच्या मणिकर्णिका घाटावर चिता जळत असतात, तसंच रसुलाबाद या घाटावरही दिवसभर चिता जळत असतात. तर दुसरीकडे लोक पर्यटनासाठी इथे येतात. संध्याकाळी येथे पर्यटकांची खूप गर्दी होते.

(हेही वाचा – NEET Paper Leak पेपर लीक प्रकरणातील आणखी एका सूत्रधाराला अटक; एमबीबीएसच्या दोन विद्यार्थ्यांवर कारवाई)

स्वच्छ घाट योजना

रसुलाबाद या घाटाच्या स्वच्छतेसाठी प्रयागराज महापालिकेने सातत्याने प्रयत्न केलेले आहेत. या घाटाचे सौंदर्य टिकवण्यासाठी येथे कचर्‍याच्या डब्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तिथे एक मोठा पिवळ्या रंगाचा प्लास्टिकचा पॉट बनवण्यात आला आहे. त्या पॉटचा वापर कचरा गोळा करण्यासाठी केला जातो. पण पर्यटनाच्या दृष्टिकोनातून तो पॉट खूपच सुंदर दिसतो. त्या पॉटसोबत पर्यटक सेल्फी घेताना दिसतात. (Sangam Ghat Prayagraj)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.