Anant-Radhika Wedding : अंबानींचा विवाह सोहळा; जळू नका, बरोबरी करा!

299
Anant-Radhika Wedding : अंबानींचा विवाह सोहळा; जळू नका, बरोबरी करा!
Anant-Radhika Wedding : अंबानींचा विवाह सोहळा; जळू नका, बरोबरी करा!
  • जयेश शत्रुघ्न मेस्त्री

सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे चिरंजीव अनंत अंबानी यांचा विवाह सोहळा पार पडला. त्याआधी प्री-वेडिंग सोहळा देखील धुमधडाक्यात पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी अंबानी यांनी ५००० कोटी रुपये खर्च केल्याचे वाचनात आले. हे ५००० कोटी म्हणजे फोर्ब्सनुसार अंबानींच्या कौटुंबिक मिळकतीच्या ०.५% एवढेच आहे. यावरुन अंबानी कुटुंबाला ट्रोल केले जात आहे. अनेक लोकांनी सोशल मीडियावर अशी पोस्ट केली आहे की, १४४ कोटी ही आपली लोकसंख्या आहे. अंबानी यांनी लग्नात इतके पैसे खर्च करण्याऐवजी प्रत्येकाला १ कोटी जरी वाटले असते तरी लोकांचे भले झाले असते. मात्र अंबानी कुटुंबाने अनंत-राधिका यांच्या विवाहाच्या (Anant-Radhika Wedding) एक आठवड्यापूर्वी पालघर येथील ५० वंचित जोडप्यांचा सामुहिक विवाह लावून दिला. इतकेच नव्हे तर मुकेश-निता अंबानी यांनी या जोडप्यांचे पालकत्व घेत मुलींना दागिने, पैसे आणि सर्व आवश्यक गोष्टी भेट दिल्या. पालघरसारख्या धर्मांतरणास प्रोत्साहन मिळणाऱ्या भागात अंबानी कुटुंबाने मुलांची लग्ने लावली हे विशेष. पण याकडे ट्रोल करणाऱ्यांनी कानाडोळा केला.

(हेही वाचा – Violence in Bangladesh : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; सर्वोच्च न्यायालयाने नोकऱ्यांमधील आरक्षण केले रद्द)

दुसरी गोष्ट अंबानी कुटुंबाने १४४ लोकांना फुकट १ कोटी का म्हणून वाटायचे? या १ कोटीमध्ये सगळेच काही गरीब, मध्यमवर्गीय किंवा सामान्य लोक नाहीत. यामध्ये अनेक मोठमोठे कलाकार आहेत, उद्योजक आहेत, नेते मंडळी आहेत, ज्यांनी चांगली संपत्ती निर्माण केलेली आहे. मी या ट्रोलर्सकडे मराठी माणसाच्या दृष्टीकोनातून पाहतो. मराठी माणसाचे दुर्दैव असे की स्वातंत्र्यवीर सावरकरांनंतर मराठी माणसाला उत्कर्षाकडे घेऊन जाणारा नेता लाभला नाही. म्हणून मराठी माणसाच्या हातात उद्योजकीय उपकरणे देण्याऐवजी दगड देण्यात आले. मराठी माणसाच्या मनात भीती निर्माण करण्यात आली की कोणीतरी तुझा घास हिरावून घेत आहे, त्यामुळे तुला हातात दगड घेऊन त्याचा प्रतिकार केला पाहिजे. या सर्व गोष्टींचा परिणाम असा झाला की मराठी माणूस अंबानींच्या तोडीचा उद्योजक होऊ शकला नाही. (Anant-Radhika Wedding)

(हेही वाचा – Budget Session 2024: अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक सुरू)

मला असं म्हणायचं नाही की मराठी माणसाची प्रगतीच झाली नाही किंवा मराठी माणसाने उद्योग केलाच नाही. पण ज्या ज्या लोकांनी मराठी माणसाला जातीजातीत विभागलं, प्रांतवाद गळ्यात मारला, उद्योजक चोर असतात – हा डावा विचार रुजवला त्या लोकांचं भलं झालं आहे, ते लोक श्रीमंत झाले आहेत आणि त्यांचे ऐकून हातात दगड घेणारे बरबाद झाले आहेत. मराठी माणूस हा प्रचंड पराक्रमी आहे. पण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्याच्या पराक्रमाला योग्य दिशा मिळाली नाही. आजही मराठी माणसाला जातीत विभागलं जात आहे. कवी भूषण म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज नसते तर सर्वांची ‘सुन्नत’ झाली असती. याचा अर्थ असा की आज भारतात हिंदू टिकला तो मराठी माणसामुळे टिकला आहे. ही किती अभिमानाची बाब आहे! मग अशा पराक्रमी मराठी माणसाला नको त्या गोष्टीत गुंतवून ठेवण्यापेक्षा छत्रपती आणि सावरकरांच्या प्रेरणेने त्याला महाराष्ट्र घडवण्यास का प्रवृत्त केले जात नाही? एवढा पैसा अंबानींच्या विवाहात उधळला गेला, तेवढा पैसा एक दिवस मराठी माणसाच्या विवाहात सुद्धा उधळला गेला पाहिजे. लक्षात घ्या, श्रीमंत माणसावर जळण्याची आपली परंपरा नाही. ही परंपरा डाव्या आणि पुरोगामी लोकांनी बनवली आहे. जे लोक अंबानींच्या नावाने बोटे मोडतात, तेच लोक अंबानींच्या लग्नात नाचताना आढळले आहेत. यावरुन तरी मराठी माणसाने सावध झाले पाहिजे आणि असल्या नेत्यांच्या नादी लागण्यापेक्षा आणि अंबानींवर टीका करण्यापेक्षा मराठी माणसाने स्वतःच अंबानीइतके श्रीमंत व मोठे होण्याचे स्वप्न पाहिले पाहिजे. आधी स्वप्न तर पाहुया, अंबानींकडून प्रेरणा तर घेऊया, कालांतराने श्रीमंतही होऊ! (Anant-Radhika Wedding)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.