जम्मूमध्ये Terrorist Attacks ची मालिका सुरुच; Rajouri येथे एक जवान जखमी

Terrorist Attacks Rajouri : गुंधा येथील 63 आरआर आर्मी कॅम्पवर गोळीबार केला, ज्यावर प्रत्युत्तराची कारवाई करण्यात आली. या वेळी एका जवानाला गोळी लागली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

142
जम्मूमध्ये Terrorist Attacks ची मालिका सुरुच; Rajouri येथे एक जवान जखमी
जम्मूमध्ये Terrorist Attacks ची मालिका सुरुच; Rajouri येथे एक जवान जखमी

जम्मूच्या राजौरी येथे सोमवार, 22 जुलै रोजी सकाळी दहशतवाद्यांनी लष्कराच्या (Terrorist Attacks) छावणीवर हल्ला केला. यामध्ये एक जवान जखमी झाला. लष्कराच्या अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवाद्यांनी राजौरीतील (Rajouri) गुंधा येथील 63 आरआर आर्मी कॅम्पवर गोळीबार केला, ज्यावर प्रत्युत्तराची कारवाई करण्यात आली. या वेळी एका जवानाला गोळी लागली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अधिक सुरक्षा दल घटनास्थळी पाठवण्यात आले. लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Mumbai Local Train Update: अति-मुसळधार पावसामुळे कल्याण येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड; मध्य रेल्वे विस्कळीत)

चालू आहे हल्ल्यांची मालिका
  • 16 जुलै रोजी जम्मूच्या डोडा जिल्ह्यातील देसामध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला होता. शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात लष्कराच्या कॅप्टनसह ४ जवान शहीद झाले होते. एका पोलिसाचाही मृत्यू झाला.
  • ८ जुलै रोजी कठुआ जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर (जेसीओ)सह ५ जवान शहीद झाले होते. 22 एप्रिलपासून जम्मू भागात 10 मोठे दहशतवादी हल्ले झाले आहेत. यामध्ये 12 जवान शहीद झाले आहेत.
  • 18 जुलै रोजी जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) कुपवाडा येथील केरन भागात लष्कराने चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. लष्कराला येथे काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर शोध मोहीम हाती घेण्यात आली.

डोडामध्येच १५ जुलै रोजी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचा कॅप्टन आणि एका पोलिसासह ५ जवान शहीद झाले होते. 16 जुलै रोजी रात्री 10:45 वाजता डोडा येथील देसा वनक्षेत्रातील कलान भाटा आणि पंचन भाटा परिसरात पहाटे 2 वाजता पुन्हा गोळीबार झाला. या घटनांनंतर लष्कराने शोध मोहीम राबवण्यासाठी जद्दन बाटा गावातील सरकारी शाळेत तात्पुरती सुरक्षा छावणी उभारली होती. धक्कादायक वास्तव आहे की, डोडा जिल्हा 2005 मध्ये दहशतवादमुक्त घोषित करण्यात आला होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.