मोदी सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यामुळे सरकारी कर्मचारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. आतापर्यंत सरकारी कर्मचारी यांच्यावर संघाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यावर बंदी होती. सरकारी कर्मचारी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) (RSS) कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. केंद्रातील मोदी सरकारनं हा निर्णय घेतला आहे. ‘आरएसएस’ च्या कार्यक्रमात सहभागी होण्याबद्दल 58 वर्षांपूर्वी बंदी घालण्यात आली होती. ती आता मोदी सरकारनं हटवली आहे. या निर्णयावरून काँग्रेसनं मोदी सरकावर हल्लाबोल केला आहे. (RSS)
(हेही वाचा- Vegetables Price Hike: सामन्यांच्या खिशाला कात्री; भाज्यांचे वाढले भाव, कडधान्ये ही कडाडली)
‘आरएसएस’ वरील (RSS) बंदी हटवण्यासंदर्भात केंद्र सरकारनं एक पत्रक काढलं आहे. त्यात आता सरकारी कर्मचारी ‘आरएसएस’ च्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात, असं म्हटलं आहे. तब्बल 58 वर्षांनी ही बंदी उठविण्यात आली आहे. “सूचनांचा आढावा घेऊन ठरविण्यात आलं की, 30 नोव्हेंबर 1966, 25 जुलै 1970 आणि 28 ऑक्टोबर 1980 मधील संबंधित कार्यालयीन स्मरणपत्रातून राष्ट्रीय स्वयंसेवकर संघाचा उल्लेख काढून टाकावा,” असं केंद्र सरकारच्या पत्रकात म्हटलं आहे. (RSS)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community