- ऋजुता लुकतुके
पॅरिस ऑलिम्पिकसाठी तयारी करत असलेल्या खेळाडूंसाठी बीसीसीआयने ८.५ कोटी रुपयांची भरघोस मदत देऊ केली आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनकडे हे पैसे सुपूर्द केले जाणार आहेत. २६ जुलैपासून पॅरिस इथं ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तिथल्या खेळाडूंच्या व्यवस्था आणि सरावासाठी हे पैसे उपयोगात आणण्यात येणार आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी अधिकृत ट्विटर हँडलवर याविषयी माहिती दिली आहे. (Paris Olympic 2024)
(हेही वाचा- Shubman Gill : ‘शुभमन भविष्यात तीनही प्रकारात भारताचं नेतृत्व करू शकतो’)
‘मला हे सांगताना अभिमान वाटतो की, पॅरिसमध्ये ऑलिम्पिकमध्ये झुंजण्यासाठी तयार झालेल्या खेळाडूंना मदत म्हणून बीसीसीआयने ऑलिम्पिक असोसिएशनला ८.५ कोटी रुपये द्यायचं ठरवलं आहे. सर्व खेळाडूंना मी सुयश चिंततो. शुभेच्छा देतो. जय हिंद!’ (Paris Olympic 2024)
I am proud to announce that the @BCCI will be supporting our incredible athletes representing #India at the 2024 Paris Olympics. We are providing INR 8.5 Crores to the IOA for the campaign.
To our entire contingent, we wish you the very best. Make India proud! Jai Hind! 🇮🇳…
— Jay Shah (@JayShah) July 21, 2024
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ११४ भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यांच्याबरोबर १४० लोकांचा सपोर्ट स्टाफही आहे. एकूण २५७ जणांचं भारतीय पथक आहे. या आर्थिक निधीमुळे भारतीय पथकाला नक्कीच मदत होणार आहे. यापूर्वीही बीसीसीआयने टोकयो ऑलिम्पिकमधील पदक विजेत्या खेळाडूंना लाखो रुपयांची मदत देऊ केली होती. (Paris Olympic 2024)
(हेही वाचा- Budget Session 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधी पक्षातील खासदारांना सल्ला; म्हणाले…)
बीसीसीआय (BCCI) हे देशातील सगळ्यात श्रींमत क्रीडाविषयक नियामक मंडळ आहे. तर क्रिकेटच्या बाबतीत ते जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट नियामक मंडळ आहे. (Paris Olympic 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community