Budget Session 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधी पक्षातील खासदारांना सल्ला; म्हणाले…

173
Budget Session 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधी पक्षातील खासदारांना सल्ला; म्हणाले...
Budget Session 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधी पक्षातील खासदारांना सल्ला; म्हणाले...

दिल्ली येथून सोमवारी (२२ जून) पासून संसदीय अधिवेशन चालू झाले आहे. हे अधिवेशन १२ ऑगस्टपर्यंत चालू राहणार आहे. यामध्ये एकूण १९ दिवस कामकाज होईल. या काळात सरकारकडून ६ विधेयकं सादर होण्याची शक्यता आहे. तसेच अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला २१ जून रोजी सर्वपक्षीय बैठक पार पडली. दरम्यान, सोमवार २२ जून पासून अधिवेशन सुरू झाले असून, तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झालेले नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भाषण केले. तसेच अर्थमंत्री निर्मला सितारामन मंगळवारी (२३ जुलै) रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहे. (Budget Session 2024)

संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारताची अर्थव्यवस्था (Indian Economy) वेगाने पुढे जातेय ही बाब प्रत्येक भारतीयांसाठी गर्वाची आहे. देशातील जनतेनं त्यांचा निकाल दिला आहे. आता निवडून आलेल्या खासदारांची जबाबदारी आहे की त्यांनी पुढील ५ वर्ष पक्षासाठी नाही तर देशासाठी लढायला हवं. पुढील साडे चार वर्ष देशासाठी समर्पित करा असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षातील खासदारांना दिला आहे.      

(हेही वाचा – Sairaj Bahutule : साईराज बहुतुले श्रीलंका दौऱ्यात करणार गोलंदाजांना मार्गदर्शन )

तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत म्हटलं की, विरोधकांनी आता जानेवारी २०२९ मध्ये मैदानात यावं. तुम्हाला ६ महिने जे काही खेळ खेळायचे आहेत ते खेळा परंतु तोपर्यंत देशातील गरीब, शेतकरी, युवा आणि महिला यांच्या प्रगतीसाठी काम करा. २०४७ चं स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही ताकदीनं प्रयत्न करत आहोत. मात्र २०१४ ला काही खासदार ५ वर्षासाठी आले, काहींना १० वर्ष काम करण्याची संधी मिळाली परंतु खूप खासदारांना संसदेत त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी मिळाली नाही. काही नकारात्मक राजकारण करणाऱ्यांनी त्यांचं अपयश झाकण्यासाठी संसदेच्या सभागृहाचा गैरवापर केला. त्यामुळे नव्या खासदारांना संधी मिळावी. त्यांना बोलायला वेळ मिळावा आणि जास्तीत जास्त लोक पुढे येऊ द्या असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. (Budget Session 2024)

(हेही वाचा – मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय; RSS-संघाच्या कार्यक्रमात सरकारी कर्मचारी होऊ शकतात सहभागी)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुढे म्हणाले की, विरोधकांचा विचार चुकीचा नाही. परंतु, नकारात्मक विचार वाईट आहे. जनता बारकाईनं आपल्या कामाकडे पाहत आहे. ६० वर्षांनी देशात तिसऱ्यांदा सरकार स्थापन झालं आहे. तिसऱ्या कार्यकाळातील पहिलं बजेट सादर करणं ही गर्वाची गोष्ट आहे असंही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं. (Budget Session 2024)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.