२२ जुलै सोमवारपासून पावसाळी अधिवेशनाला (Parliament Monsoon Session 2024) सुरुवात झाली. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान हे NEET मधील अनियमिततेवर बोलत होते. शिक्षणमंत्री म्हणाले की, नीटचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे आणि न्यायालय जे काही निर्देश देईल त्याचे सरकार पालन करेल. न्यायालयाने सर्व विद्यार्थ्यांचे शहर आणि केंद्रनिहाय निकाल जाहीर करण्यास सांगितले होते, जे सार्वजनिक डोमेनमध्ये आहेत.
(हेही वाचा – Budget Session 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधी पक्षातील खासदारांना सल्ला; म्हणाले…)
परीक्षा पद्धत मूर्खपणाची – राहुल गांधी
या वेळी विरोधकांनी गदारोळ करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, देश पहात आहे की, परीक्षा पद्धतीत अनेक त्रुटी आहेत. शिक्षणमंत्र्यांनी प्रत्येकाच्या उणिवा मोजल्या, पण स्वतःच्या उणिवा मोजल्या नाहीत. आपली परीक्षा पद्धत मूर्खपणाची आहे.
राहुल गांधी यांच्या आरोपाला शिक्षणमंत्र्यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, “नुसते ओरडून खोटे सत्य होत नाही. देशाची परीक्षा पद्धत मूर्खपणाची असल्याचे विरोधी पक्षनेत्याचे विधान अत्यंत निषेधार्ह आहे. काँग्रेसने सरकार कसे चालवले, हे जनतेला माहीत आहे. आमचे सरकार रिमोटने चालत नाही. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी NEET वर प्रश्न उपस्थित केले.
अधिवेशनाच्या या 22 दिवसांत 19 बैठका होणार आहेत. मोदी सरकार 23 जुलै रोजी पहिला सामान्य अर्थसंकल्प सादर करणार आहे. आज सरकार आर्थिक सर्वेक्षण आणणार आहे. यानंतर 6 नवीन विधेयके आणली जातील.
हेही पहा –