- ऋजुता लुकतुके
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेनंतर भारताचा टी-२० संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर रवाना झाला. या दौऱ्यात भारतीय संघ ३ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे. २७ जुलैपासून टी-२० मालिकेला सुरुवात होईल. या मालिकेत सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. ‘राहुल द्रविड आणि रवी शास्त्री यांची जागा घेणं हे सगळ्यात मोठं आव्हान असेल,’ असं यावेळी गौतम गंभीरने बोलून दाखवलं. (India’s Tour of Sri Lanka)
#WATCH | Mumbai | Indian Men’s Cricket Team arrives at the Airport, they’ll leave for Sri Lanka, shortly.
Indian Cricket Team will play the ODI and T20I series, 3 matches each, against Sri Lanka, starting on July 27 and ending on August 7. pic.twitter.com/ykoL797TuO
— ANI (@ANI) July 22, 2024
(हेही वाचा – Paris Olympic 2024 : पॅरिसला निघालेल्या भारतीय खेळाडूंना बीसीसीआयची आर्थिक मदत)
ही खूपच मोठी जबाबदारी – गंभीर
टी-२० आणि एकदिवसीय मालिकेतही शुभमन गिलकडे उपकर्णधार पद सोपवण्यात आलं आहे. रोहित आणि विराट यांनी टी-२० मधून निवृत्ती घेतली असली तरी एकदिवसीय मालिकेत ते खेळणार आहेत. दोघांबरोबरच रवींद्र जाडेजाही टी-२० मधून बाहेर पडलाय. पण, त्याचा समावेश एकदिवसीय संघातही नाही. यावर त्याला विश्रांती देण्यात आल्याचं गंभीर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. (India’s Tour of Sri Lanka)
‘भारताला या हंगामात १० कसोटी सामना खेळायचे आहेत आणि त्यादृष्टीने रवींद्र जाडेजा हा महत्त्वाचा खेळाडू आहे,’ असं गंभीर त्याच्याविषयी बोलताना म्हणाले. नवीन जबाबदारीविषयी बोलताना गंभीर म्हणाले, ‘ही खूपच मोठी जबाबदारी आहे. एका विजेत्या संघाला मार्गदर्शन करणं नक्कीच कठीण आहे. त्याहून कठीण आहे, राहुल, रवी शास्त्री यांनी रिक्त केलेली जागा भरून काढणं. मी एक आनंदी आणि सुरक्षित ड्रेसिंग रुम तयार करण्याचा प्रयत्न करेन.’ (India’s Tour of Sri Lanka)
विराट कोहली आणि आपलं नातंही घट्ट मैत्रीचं असल्याचं गंभीरने स्पष्ट केलं. गंभीरच्या विनंतीप्रमाणेच अभिषेक नायर, रायन टेन ड्युसकाटे आणि साईराज बहुतुले हे तिघे प्रशिक्षक त्याच्याबरोबर सपोर्ट स्टाफ म्हणून श्रीलंकेला जाणार आहेत. टी-२० मालिकेतील ३ सामने २७, २८ आणि ३० जुलै रोजी पल्लिकल इथं होतील. तर एकदिवसीय सामने ३, ४ आणि ७ ऑगस्टला कोलंबो इथं होणार आहेत. (India’s Tour of Sri Lanka)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community