Uddhav Thackeray – Sharad Pawar यांनी आरक्षणावर बोलायला हवे; Laxman Hake आक्रमक

179
Uddhav Thackeray - Sharad Pawar यांनी आरक्षणावर बोलायला हवे; Laxman Hake आक्रमक
Uddhav Thackeray - Sharad Pawar यांनी आरक्षणावर बोलायला हवे; Laxman Hake आक्रमक

मनोज जरांगे यांचे आंदोलन बेकायदेशीर आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange) करत असलेल्या मागण्याही बेकायदा आहेत. जरांगे कोणाच्या तरी स्क्रिप्टवर राजकारण करत आहेत. दंगली घडवण्याचा ओबीसींचा इतिहास नाही. महामानवांच्या पुतळ्याखाली बसून आम्ही कधी शिवीगाळ केली नाही. ते अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतात. आमच्यात फूट पाडण्याचे काम मनोज जरांगे पाटील करत आहेत, या शब्दांत लक्ष्मण हाके यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला.

(हेही वाचा – Budget 2024: बजेटच्याआधी आलेल्या आर्थिक सर्वेक्षणात नेमकं काय?)

जालन्यातील दोदडगाव येथून मंडल स्तंभाला अभिवादन करून ओबीसी बचाव जनआक्रोष यात्रा सुरु करण्यात आली. त्या वेळी हाके बोलत होते. या वेळी हाके यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे आरक्षणावर बोलत नाहीत, याकडेही लक्ष वेधले.

शरद पवार मूग गिळून गप्प

मराठा ओबीसी प्रश्न राज्यात तीव्र स्वरुप घेत असताना हा वाद शरद पवारांनी सोडवला पाहिजे. शरद पवार हेही मनोज जरांगेंची भाषा बोलत आहेत. ओबीसी आरक्षणावर (maratha obc reservation) शरद पवार (Sharad Pawar) मूग गिळून गप्प बसले. शरद पवारांसह उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही बोलायला हवे. महाराष्ट्राच्या ओबीसींच्या मनात स्वाभिमान आणि विश्वास निर्माण केला पाहिजे. महाराष्ट्रात कुणबींच्या बोगस नोंदी झाल्या आहेत. त्या किती झाल्यात हे सरकारने सांगावे, अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली.

आंदोलने जालन्यातच का ?

जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटीत किंवा वडीगोद्री गावातच उपोषण का करतात, असे अनेकांना वाटले. त्यांना कोणाला तरी टार्गेट करायचे असेल, अशा शंकाही घेण्यात आल्या. जालना जिल्हा ही ओबीसींच्या आंदोलनाची सुपीक भूमी आहे. मंडल आयोग असताना जालना जिल्ह्यातून अनेक सभा झाल्या आहेत. मंडळ आयोगाच्या स्तंभाजवळून आम्ही आमच्या आंदोलनाची दिशा ठरवत आहोत, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.