- ऋजुता लुकतुके
भारतीय कर्णधार रोहित शर्मा सध्या आपली पत्नी रितिका आणि मुलगी समायरासोबत परदेशात सुटी घालवत आहे. टी-२० विश्वचषकात भारताने मिळवलेल्या विजयानंतर रोहितने टी-२० मधून निवृत्ती पत्करली आहे. श्रीलंकेत एकदिवसीय मालिका खेळण्यापूर्वी तो पुन्हा ताजातवाना होण्यासाठी एक ब्रेक घेताना दिसतोय. रोहित आणि विराट, दोघेही श्रीलंका दौऱ्यातून माघार घेतली, असं बोललं जात होतं. पण, आता एकदिवसीय संघात दोघांचा समावेश करण्यात आलाय. (Rohit Sharma)
चॅम्पियन्स करंडकापूर्वी भारतीय संघ फक्त ६ एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्यामुळे भारताचा सर्वोत्तम संघ या मालिकांमध्ये असावा असा नवे प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा हट्ट होता. (Rohit Sharma)
रोहितने रविवारी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. याला त्याने मथळा दिलाय, ‘स्विच ऑफ व रिसेट.’ थोडक्यात, सुट्टीनंतर ताजातवाना होऊन नवीन मालिकेसाठी तो तयार आहे, असंच त्याला म्हणायचंय. (Rohit Sharma)
View this post on Instagram
(हेही वाचा – सकाळी सिग्नल यंत्रणा कोलमडली, आता एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड! Central Railway पुन्हा विस्कळीत)
श्रीलंकेविरुद्घची एकदिवसीय मालिका २ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. रोहित या मालिकेसाठी संघाचं नेतृत्वही करणार आहे. स्टार फलंदाज विराट कोहलीही सध्या त्याची पत्नी अनुष्का आणि दोन्ही मुलांसह लंडन इथं आहे. तो एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतात परतणार आहे. (Rohit Sharma)
रोहित ३६ वर्षांचा आहे. आगामी चॅम्पियन्स करंडक तसंच कसोटी अजिंक्यपद स्पर्धेपर्यंत तो खेळणार हे निश्चित आहे. तर विराट कोहली ३५ वर्षांचा आहे. त्याची तंदुरुस्ती आणि फॉर्म पाहता, तो आणखी काही वर्षं एकदिवसीय तसंच कसोटी क्रिकेट खेळू शकतो, असा अंदाज आहे. (Rohit Sharma)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community