Rafael Nadal : नॉर्डिया चषकाच्या अंतिम फेरीत राफेल नदालचा पराभव

Rafael Nadal : २०२२ नंतर अंतिम फेरीत पराभूत होण्याची नदालची ही पहिलीच वेळ आहे.

151
Rafael Nadal : नॉर्डिया चषकाच्या अंतिम फेरीत राफेल नदालचा पराभव
  • ऋजुता लुकतुके

नॉर्डिया चषकात दिग्गज टेनिसपटू राफेल नदालची विजयी मालिका अखेर अंतिम फेरीत संपुष्टात आली. नुनो बोर्गेसने त्याला ६-३ आणि ६-२ ने हरवलं. एकूण पाचवेळा नदालची सर्व्हिस भेदली गेली. पोर्तुगीज बोर्गेसचा हा पहिला एटीपी विजय होता. २०२२ च्या फ्रेंच ओपन स्पर्धेनंतर नदालने पहिल्यांदाच एका स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. पण, अंतिम फेरीत त्याचा खेळ मनासारखा झाला नाही. खुद्द बोर्गेससाठी हा विजय अनपेक्षित होता. (Rafael Nadal)

‘हे वेड लावणारं आहे. टेनिसमध्ये तुम्ही कधी कधी आशा लावून असता, तेव्हा काही होत नाही. अनपेक्षितपणे विजयाचं दान तुमच्या पदरात पडतं,’ असं बोर्गेसने विजयानंतर बोलून दाखवलं. (Rafael Nadal)

‘तुम्हाला सगळ्यांना राफाला जिंकताना बघायचं होतं. मलाही काहीसं तसंच वाटत होतं. पण, माझ्यातील एक मोठा हिस्सा असा होता, ज्याला स्वत:ला जिंकावंसं वाटत होतं. मग मी निकराचा प्रयत्न केला,’ असं बक्षीस वितरणाच्या वेळी बोर्गेस म्हणाला. (Rafael Nadal)

(हेही वाचा – Maratha Reservation : आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! मुख्यमंत्री शिंदेंनी केली घोषणा)

यापूर्वी नदालने १९ व्या वर्षी ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर तो इथं खेळलाही नव्हता. पण, यंदा ऑलिम्पिकची तयारी म्हणून तो या स्पर्धेकडे बघत होता. एकेरीबरोबरच तो दुहेरीतही खेळला. ऑलिम्पिक क्ले कोर्टवर होणार असल्यामुळे नदालने विम्बल्डन न खेळणंच पसंत केलं. तेव्हापासून क्ले कोर्टवरच लक्ष केंद्रीत केलं आहे. मागची दीड वर्षं तो पोट आणि पायाच्या स्नायूंच्या दुखापतीने बेजार आहे. पण, त्याला निवृत्तीपूर्वी थोडंफार व्यावसायिक टेनिस खेळायचं आहे. आणि त्यासाठी तो झगडतोय. (Rafael Nadal)

ऑलिम्पिकच्या तयारीच्या दृष्टीने नदालसाठी हा अनुभव चांगलाच असणार आहे. तर बोर्गेसने मिळवलेलं पहिलं एटीपी विजेतेपद त्याचा उत्साह वाढवणारं असेल. (Rafael Nadal)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.