पुणे तिथे काय उणे हीच म्हण बोलण्याची वेळ आली आहे. कारण चक्क चोराने दागिने किंवा पैसे ऐवजी एका श्वानाची चोरी (Pune Dog Thief) केली आहे. श्वानाची चोरीची पुण्यातील अशीच पहिली घटना असावी. रविवारी झालेल्या श्वानाच्या चोरीनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रविवारी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी बॉक्सर जातीचे श्वान चोरून नेल्याचा प्रकार पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाणे परिसरात घडला आहे.
सायंकाळी सहाच्या सुमारास तारा रस्त्यावर गुजरवाडी फाटा येथील मैनी टॉवर येथे वास्तव्याला असणारे सिदकसिंग विमितसिंग मैनी यांचा बॉक्सर जातीचा श्वान चोरट्यांनी पळवला आहे. ही घटना १६ जुलैला सायंकाळी सहाच्या दरम्यान सातारा रस्त्यावर गुजरवाडी फाटा येथील मैनी टॉवर येथे घडली आहे. (Pune Dog Thief)
चोरट्याने श्वानाला का चोरले?
या घटनेनंतर सिदकसिंग विमितसिंग मैनी (वय २४, कौंसिल हॉल चौक) याने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात श्वान चोरीची तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणात पुढील तपास सुरु आहे. अद्याप चोरट्याने श्वानाला का चोरले असावे असा प्रश्न परिसरातील नागिरकांना सतावत आहे. (Pune Dog Thief)
माहिती देणाऱ्यांना २५ हजार रुपयाचे रोख बक्षीस
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, तक्रारदार सिदकसिंग मैनी यांचे गुजरवाडी फाटा परिसरात बॅटरीचे गोडावून आहे. मैनी यांनी बॉक्सर जातीचे श्वान पाळले आहे. त्यांनी सायंकाळी श्वान नेहमीप्रमाणे ऑफिस खाली फिरण्यासाठी सोडले होते. दुचाकीस्वार चोरट्याने त्याला आधी जवळ घेतले आणि बाजूला थांबलेला रिक्षातून पळवून नेले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. श्र्वानाचे नाव जॅकी असून, त्याची माहिती देणाऱ्यांना २५ हजार रुपयाचे रोख बक्षीस तक्रारदार यांनी जाहीर केले आहे. (Pune Dog Thief)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community