Vishalgarh वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल; मुंबईत अल्पसंख्यांकांना भडकावण्याचा प्रयत्न, एकाला अटक

242
Vishalgad हिंसाचारप्रकरणी अल्पसंख्यांक आयोगाची मुख्य सचिवांना नोटीस

कोल्हापुरातील विशाळगडावर झालेल्या हिंसक घटनेनंतर मुंबईतील काही समाजकंटकांकडून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या समाजकंटकांकडून वादग्रस्त व्हिडीओ बनवून हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहेत. व्हायरल होत असलेल्या या वादग्रस्त व्हिडीओ प्रकरणी मुंबईतील एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे. (Vishalgarh)

मोहम्मद मासुम रजा शमीम शेख (२५) असे अटक करण्यात आलेल्या समाजकंटकाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध दोन समाजातील गटांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने व्हिडिओ प्रसारित केल्याच्या आरोपावरून भारतीय न्याय संहिता कलम १९६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे, अशी माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी दिली आहे. कोल्हापुरात असलेल्या विशाळगड किल्ल्यातील अतिक्रमण विरोधी कारवाईला हिंसक वळण लागले होते. हे प्रकरण संपूर्ण राज्यात तापले असून काही समाजकंटाकाकडून हे प्रकरण पेटविण्याचा प्रयत्न सुरू आहे. (Vishalgarh)

(हेही वाचा – पुढील ५ वर्षांसाठी एक ग्रॅमही दुधाची भुकटी आयात करणार नाही; Amit Shah यांचे आश्वासन)

राज्यभरात काही समाजकंटकांचा दोन समाजात तेढ निर्माण व्हावा यासाठी व्हिडीओ बनवून ते व्हिडीओ सोशल मीडिया, युट्युब, इन्स्टाग्रामवर व्हायरल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून एका समाजाला भडकावण्यात येत असून मुंबईत देखील या व्हिडीओचे पडसाद उमटण्यापूर्वी मुंबई पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन व्हिडीओ बनविणारे आणि व्हायरल करणाऱ्या समाजकंटकांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. (Vishalgarh)

एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्हिडीओ प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, या प्रकरणी मोहम्मद मासुम रजा शमीम शेख याला अटक केली आहे. सोशल मीडियावर होत असलेल्या वादग्रस्त व्हायरल व्हिडीओ डिलीट करण्यासाठी पोलिसांनी संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला पत्रव्यवहार करण्यात येत आहे, दोन समाजात तेढ निर्माण करणारे व्हिडीओ सोशल मीडियावरून काढून टाका अशी विनंती मुंबई पोलिसांकडून या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडे करण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. (Vishalgarh)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.