शालेय शिक्षण सेवकांप्रमाणेच आश्रमशाळांतील शिक्षकांच्या मानधनातही वाढ करण्याचा निर्णय आदिवासी विभागाने घेतला आहे. त्यानुसार प्राथमिक शिक्षण सेवक, माध्यमिक शिक्षण सेवक आणि उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांच्या मानधानात १० हजारांनी वाढ केली जाणार आहे. आदिवासी विभागाने या संदर्भातील परिपत्रक काढले आहे. (Tribal Ashram School)
(हेही वाचा – मराठा समाजाने सातबारा तुमच्या नावावर केलाय का? Pravin Darekar यांचा जरांगेंना सवाल)
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने २०२२ साली शिक्षण सेवकांचे मानधन वर्ग-४ कर्मचाऱ्यांच्या वेतनाएवढे सुधारित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्राथमिक शिक्षण सेवकांच्या मानधनात ६ हजारांवरून १६ हजार रुपये, माध्यमिक शिक्षण सेवकांचे मानधन ८ हजारांवरून १८००० रुपये तर उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांचे मानधन ९ हजारांवरून २० हजार करण्यात आले आहेत. १ जानेवारी २०२३ पासून ही वाढ लागू करण्यात आल्याचे आदिवासी विभागाने घेतलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना भरघोस एरियर मिळणार आहे. (Tribal Ashram School)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community