युद्धनौका INS Brahmaputra चा अपघात; 1 अधिकारी बेपत्ता

194
युद्धनौका INS Brahmaputra चा अपघात; 1 अधिकारी बेपत्ता
युद्धनौका INS Brahmaputra चा अपघात; 1 अधिकारी बेपत्ता

राजधानी मुंबईतील अरबी समुद्रातील विविध बंदरावरून जहाजांची ये-जा सुरू असते. येथील काही महत्त्वाच्या बंदरावर युद्धनौकाही तैनात असतात. मुंबई (mumbai) हे देशाची आर्थिक राजधानी आणि महत्त्वाचे शहर आहे. त्यामुळे युद्धनौकांच्या माध्यमातून समुद्री सुरक्षा तैनात करण्यात येते. त्यापैकीच एक असलेल्या आयएनएस ब्रह्मपुत्रा या युद्धनौकेचा समुद्रात अपघात झाल्याची माहिती आहे.

(हेही वाचा – समग्र शिक्षा अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत अभ्यास समिती; CM Eknath Shinde यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय)

या युद्धनौकेमध्ये (battleship) रविवार, २१ जुलै रोजी आग लागल्याची घटना घडली होती. या अपघातात एक जूनियर सेलर बेपत्ता झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. मुंबई बंदरात नेवल डॉकयॉर्डवर युद्धनौकेचं री फिटिंग सुरू होतं. त्यादरम्यान ही आग लागली.

युद्धनौका पूर्ववत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

युद्धनौका समुद्रात एका बाजूने झुकल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बचाव पथक आणि संबंधित यंत्रणांकडून युद्धनौका पूर्ववत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. नौसेना डॉकयॉर्ड, मुंबई (एनडी एमबीआय) आणि बंदरगाह येथील बंदरावर असलेल्या इतर जहाजांच्या अग्निशमन दलाने ब्रह्मपुत्रावरील आग आटोक्यात आणण्यात मोलाची भूमिका निभावली. मात्र दुपारनंतर ही युद्धनौका एका बाजूने कलंडायला सुरुवात झाली आहे.

सध्या ही युद्धनौका पूर्णपणे एका बाजूने कलंडलेल्या स्थितीत आहे. ती आणखी खोलात जात आहे. सातत्याने शर्थीचे प्रयत्न करुनही जहाज पूर्ववत उभे करण्यात यश आलेले नाही. युद्धनौका पूर्ववत स्थितीत आणण्याचे सर्व प्रयत्न करण्यात आले, मात्र अजूनही त्यात यश आलेले नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.