T20 World Cup 2024 : आयसीसी करणार टी-२० विश्वचषका दरम्यानच्या सुविधा, खेळपट्टी दर्जाची चौकशी

कोलंबो इथं झालेल्या वार्षिक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

137
T20 World Cup 2024 : टी-२० विश्वचषकातील खेळपट्ट्यांवर फक्त ३ खेळपट्ट्या खेळण्यासाठी अयोग्य - आयसीसी
  • ऋजुता लुकतुके

अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये नुकताच टी-२० विश्वचषक (T20 World Cup 2024) पार पडला. या स्पर्धेचं आयोजन, स्पर्धेदरम्यानची तिथली परिस्थिती यांची चौकशी करण्यासाठी आयसीसीने तीन सदस्यीय समिती नेमली आहे. ‘रॉजर टोज, इमरान ख्वाजा आणि लॉसन नायडू या तिघांची समिती स्थापन झाली आहे. ही समिती विश्वचषक स्पर्धेचा अहवाल तयार करून तो आयसीसीसमोर सादर करेल,’ असं आयसीसीने आपल्या पत्रकात म्हटलं आहे.

यंदा पहिल्यांदाच ही स्पर्धा अमेरिकेत आयोजित करण्यात आली. न्यूयॉर्क, डॅलस आणि फ्लोरिडा इथं पहिल्या फेरीतील सामने झाले. आणि या सामन्यांना प्रेक्षकांची अजिबात गर्दी नव्हती. या तीनही ठिकाणची मिळून एकूण तिकीट विक्री २० दशलक्ष अमेरिकन डॉलरच्या आसपास झाली. या गोष्टीचीही आयसीसीने गंभीर दखल घेतली आहे. कारण, फक्त भारताच्या सामन्यांनाच इथं गर्दी होत होती. (T20 World Cup 2024)

(हेही वाचा – Budget Session 2024: केंद्र सरकारची मोठी घोषणा! विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी: आता देशांतर्गत शिक्षणांसाठी मिळणार १० लाखांचे कर्ज)

याउलट अमेरिकेत सामने भरवण्यासाठी आयसीसीला १५० दशलक्ष अमेरिकन डॉलर इतका खर्च आला. त्यातही आधी ठरवलेल्या खर्चापेक्षा अतिरिक्त खर्च इथं सामने भरवताना आला. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या शक्यतेचीही चौकशी होणार आहे. क्रिकेट अमेरिका या संपूर्ण तपासाला सहाय्य करणार आहे. (T20 World Cup 2024)

या चौकशी बरोबरच स्पर्धेदरम्यान सुविधांचा अभाव आणि खेळासाठी पोषक नसलेली खेळपट्टी यांचाही विचार होणार आहे. ही चौकशी होणार असली तरी अमेरिकेत क्रिकेटने चंचूप्रवेश केल्याबद्दल आयसीसीने समाधान व्यक्त केलं आहे. आणि २०३० च्या टी-२० विश्वचषकापर्यंत (T20 World Cup 2024) सहभागी देशांची संख्या १२ वरून १६ वर नेण्याचा मानस बोलून दाखवला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.