Lokmanya Tilak Jayanti : राष्ट्रप्रथम ही भावना रुजवण्यासाठी केली डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना

154
Lokmanya Tilak Jayanti : राष्ट्रप्रथम ही भावना रुजवण्यासाठी केली डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना

केशव गंगाधर टिळक म्हणजेच आपले लोकमान्य टिळक यांचा जन्म २३ जुलै १८५६ साली रत्नागिरी इथल्या एका हिंदू चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील गंगाधर टिळक हे शिक्षक होते. लोकमान्य टिळक सोळा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांना देवाज्ञा झाली. टिळकांचं लग्न तापीबाई यांच्याशी झालं होतं. लग्नानंतर तापीबाईंचं नाव सत्यभामा असं ठेवण्यात आलं होतं. (Lokmanya Tilak Jayanti)

लोकमान्य टिळकांनी १८७७ साली पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून गणित या विषयात बी.ए.चं पदवी शिक्षण पहिल्या श्रेणीत पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी एम.ए. चा अभ्यास सुरू केला खरा, पण त्यांना एल.एल.बी. ची पदवी मिळवायची होती म्हणून त्यांनी एम.ए.चं शिक्षण अर्धवट सोडलं. पुढे १८७९ साली लोकमान्य टिळकांनी सरकारी लॉ कॉलेजमधून आपलं एल.एल.बी.चं शिक्षण पूर्ण करून पदवी मिळवली. (Lokmanya Tilak Jayanti)

(हेही वाचा – Union Budget 2024 : करदात्यांसाठी मोठी घोषणा; नव्या करप्रणालीत ‘इतक्या’ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त)

पदवी मिळवल्यानंतर लोकमान्य टिळकांनी पुण्यातल्या एका प्रायव्हेट शाळेमध्ये गणित हा विषय शिकवायला सुरुवात केली. पण काही काळाने त्यांचे आपल्या सहकाऱ्यांशी वैचारिक मतभेद झाले त्यामुळे त्यांनी ती नोकरी सोडली आणि पत्रकारितेला सुरुवात केली. (Lokmanya Tilak Jayanti)

१८८० साली लोकमान्य टिळकांनी गोपाळ गणेश आगरकर, महादेव बल्लाळ नामजोशी आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर या मित्रांसोबत मिळून प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणासाठी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. भारतातल्या तरुणांसाठी शिक्षणाचा दर्जा सुधारणे हे त्यांचं ध्येय होतं. त्यांनी स्थापन केलेली शाळा चांगली चालू लागली. (Lokmanya Tilak Jayanti)

(हेही वाचा – Budget Session 2024: केंद्र सरकारची मोठी घोषणा! विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी: आता देशांतर्गत शिक्षणांसाठी मिळणार १० लाखांचे कर्ज)

शाळेला मिळालेल्या यशामुळे त्यांनी १८८४ साली डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि एक नवीन शिक्षणपद्धती तयार केली. या शिक्षणपद्धतीमध्ये भारतीय संस्कृतीवर जोर देऊन तरुण भारतीयांना राष्ट्रवादी विचार शिकवले जातात. राष्ट्रप्रथम ही भावना तरुण विद्यार्थ्यांमध्ये रुजवली जाते. याच एज्युकेशन सोसायटीने पुढे १८८५ माध्यमिकोत्तर आणि पदवी शिक्षणासाठी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. लोकमान्य टिळक हे फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक होते. (Lokmanya Tilak Jayanti)

१८९० साली उघडपणे राजकीय कार्य करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी सोडली. त्यांनी धार्मिक आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनावर भर देऊन स्वातंत्र्याच्या दिशेने एक व्यापक चळवळ सुरू केली. लोकांनी त्यांना लोकमान्य ही पदवी बहाल केली. लोकमान्य म्हणून मान्यता मिळालेले ते एकमेव क्रांतिकारक होते. (Lokmanya Tilak Jayanti)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.