मढ बेट हे उत्तर मुंबईमधलं कोळी बांधवांच्या आणि शेतकरी बांधवांच्या गावांचा समूह असलेलं बेट आहे. (madh island mumbai)
-
मढ बेटाचं क्षेत्रफळ
मढ बेट हे क्षेत्र पश्चिमेच्या अरबी समुद्राने आणि पूर्वेला असलेल्या मालाडच्या खाडीने वेढलेलं आहे. या बेटावर एरंगळ बीच, दाना पानी बीच, सिल्व्हर बीच आणि अक्सा बीच सारखे काही समुद्रकिनारे आहेत. (madh island mumbai)
-
मढ बेटावर कसे पोहोचता येईल?
या बेटावर पोहोचण्यासाठी बसने मालाड स्टेशनहून २७१ नंबरची बस आणि बोरीवली पश्चिम येथून गोराई डेपोमधून २६९ नंबरच्या बसने जाता येतं किंवा मालाड स्टेशनहून ऑटोरिक्षानेसुद्धा मढ येथे जाता येतं. तसंच वर्सोवा जेट्टीवरून मढ बेटावर पोहोचण्यासाठी एक फेरी सेवा देखील उपलब्ध आहे किंवा स्पीड बोटीचा वापर करूनही मढ बेटावर पोहोचता येतं. (madh island mumbai)
(हेही वाचा – hotel galaxy : मुंबईतील गॅलेक्सी हॉटेलमध्ये जा आणि सुखसोयींचे जबरदस्त पॅकेज मिळवा!)
-
मढ बेटावर वसलेली लोकसंस्कृती
मढ बेट हा ग्रामीण भाग आहे. या बेटावर प्रामुख्याने कोळी, मराठी, बॉम्बे ईस्ट इंडियन, रोमन कॅथलिक आणि इतर समुदायातले लोक राहतात. (madh island mumbai)
-
मढचा किल्ला
मढचा किल्ला हा उत्तर मुंबई भागामध्ये वसलेला एक छोटासा किल्ला आहे. पूर्वी इथे पोर्तुगीजांनी राज्य केलं होतं. त्याकाळी हा किल्ला बांधण्यात आला होता. फेब्रुवारी १७३९ साली मराठा साम्राज्याने हा किल्ला ताब्यात घेतला. पुढे ब्रिटिशांनी १७७४ साली मढ बेट, सालसेट बेट, ठाण्याचा किल्ला, वर्सोवा किल्ला आणि कारंजा बेट किल्ला ताब्यात घेतला. (madh island mumbai)
मालाड स्टेशनपासून जवळपास १५ किलोमीटरच्या अंतरावर हे बेट आहे. तसं इथे पोहोचणं कठीण आहे. पण बेस्ट बस सेवेच्या २७१ नंबरच्या बसने इथे पोहोचता येतं किंवा वर्सोवा फेरी बोटीने जायचं असल्यास मढ बेट हा शेवटचा थांबा आहे. (madh island mumbai)
मढचा किल्ला हा मढ गावाच्या दक्षिणेला वसलेला आहे. हा किल्ला मढ मंदिर बस स्टॉपपासून जवळपास २ किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला १७व्या शतकात पोर्तुगीजांनी टेहाळणी बुरूज म्हणून बांधला होता. त्यामुळे किनारपट्टीचे दृश्य दिसतं आणि मार्वे खाडीचं रक्षणही करता येतं. किल्ल्याचा बाह्य दर्शनी भाग शाबूत आहे पण अंतर्गत भाग जीर्ण झाला आहे. सध्या हा किल्ला भारतीय हवाई दलाच्या नियंत्रणाखाली आहे. कारण तो भारतीय हवाई दलाच्या तळाजवळ आहे. या किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी परवानगीची आवश्यकता असते. मढचा किल्ला पर्यटकांसाठी खुला नाही. हा किल्ला स्थानिक कोळी समुदायांनी वेढलेला आहे. (madh island mumbai)
-
प्रसिद्ध चित्रपटांचं चित्रीकरण
मढच्या किल्ल्यावर दिवाना, लव्ह के लिए कुछ भी करेगा, बाजीगर, शूटआउट ॲट वडाला आणि मनमोहन देसाई यांचा १९८५ साली प्रदर्शित झालेला चित्रपट मर्द, जमाना दिवाना, खलनायक, शतरंज, तराजू आणि गेम यांसारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांचं शूटिंग झालं आहे. याव्यतिरिक्त नामकरण, चंद्रकांता, सी.आय.डी., आहट आणि सुपरकॉप्स व्हर्सेस सुपरव्हीलन्स या लोकप्रिय मालिकांचे अनेक भागाचं शूटिंग मढच्या किल्ल्यावर करण्यात आलं आहे. (madh island mumbai)
याव्यतिरिक्त मढ बेटावर अनेक रिसॉर्ट्स बांधण्यात आले आहेत. हे रिसॉर्ट्स पॉकेट फ्रेंडली असल्यामुळे तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत आणि कुटुंबासोबत आपल्या आयुष्यातले अमूल्य क्षण इथे जगू शकता. (madh island mumbai)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community