NPS Vatsalya Scheme : मुलांचे भविष्य सुरक्षित करणारी ‘एनपीएस-वात्सल्य’ योजना काय? अर्थसंकल्पात केली घोषणा

155
NPS Vatsalya Scheme : मुलांचे भविष्य सुरक्षित करणारी ‘एनपीएस-वात्सल्य’ योजना काय? अर्थसंकल्पात केली घोषणा
NPS Vatsalya Scheme : मुलांचे भविष्य सुरक्षित करणारी ‘एनपीएस-वात्सल्य’ योजना काय? अर्थसंकल्पात केली घोषणा

मोदी 3.0 सरकारचा अर्थसंकल्प (Union Budget 2024) अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी संसदेत सादर केला. या बजेटमध्ये वेगवेगळ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये त्यांनी राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत एनपीएस वात्सल्य (NPS Vatsalya Scheme) ही आणखी एक योजना जाहीर केली आहे. NPS वात्सल्य अंतर्गत, तुम्ही आता तुमच्या अल्पवयीन मुलाच्या नावावर NPS खाते उघडून त्यात पैसे जमा करू शकाल. मूल १८ वर्षांचे झाल्यानंतर, हे NPS वात्सल्य नियमित NPS योजनेत रूपांतरित केले जाऊ शकते.

एनपीएस वात्सल्य योजना काय आहे?
निर्मला सीतारमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, एनपीएस वात्सल्य ही योजना अल्पवयीन मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक बचत करण्याच्या उद्देशाने जाहीर करण्यात आली आहे. या योजनेनंतर्गत पालक त्यांच्या अल्पवयीन मुलांच्या नावाने बॅंक खात्यात पैस जमा करू शकतील. तसेच त्याद्वारे राष्ट्रीय पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकतील. महत्त्वाचे म्हणजे १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर हे खाते मुलांच्या नावे हस्तांतर करता येणार आहे. १८ ते ७० वर्ष वयोगटातील प्रत्येक भारतीय नागरीकाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. (NPS Vatsalya Scheme)

NPS पुनरावलोकन करणारी समिती
अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी माहिती दिली की एनपीएसचा आढावा घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने खूप काम केले आहे. आतापर्यंतच्या प्रगतीवर समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले. समितीचा अंतिम अहवाल प्राप्त होताच NPS बाबत घोषणा केली जाईल. (NPS Vatsalya Scheme)

नॅशनल पेन्शन सिस्टीम म्हणजे काय ते जाणून घ्या
केंद्र सरकारने सन 2004 मध्ये राष्ट्रीय पेन्शन प्रणाली सुरू केली. हे PFRDA द्वारे नियंत्रित केले जाते. NPS मध्ये दोन प्रकारची खाती आहेत, टियर 1 आणि टियर 2. NPS मध्ये केलेल्या योगदानावर तुम्ही आयकर कलम 80C अंतर्गत सूट मिळवू शकता. याशिवाय कलम 80CCD अंतर्गत 50 हजार रुपयांची अतिरिक्त वजावट मिळू शकते. (NPS Vatsalya Scheme)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.