Uddhav Thackeray यांची ‘ती’ स्टँडर्ड धमकी कोणती?

225
शिवसेना आणि राष्ट्रवादीचा निर्णय ५० ते ६० वर्षात लागेल; Uddhav Thackeray यांचे न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

मुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेण्यासाठी मित्रपक्षांशी, मतदारांशी दगा-फटका करायचा, हीच शिवसेना उबाठाप्रमुख उद्धव ठाकरे यांची रणनीती राहिली आहे. ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी भाजपाला ‘मी दुसऱ्या टोकाला जाईन’ अशी धमकी दिली होती. आपल्याला जे हवं ते पदरात पाडून घेण्यासाठी तशीच धमकी त्यांनी महाविकास आघाडीलाही दिली आणि ही त्यांची ‘स्टँडर्ड धमकी’ आहे, असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांनी त्यांच्या ‘प्रतिपक्ष’ या यु-ट्यूब चॅनलवर मत व्यक्त केले. (Uddhav Thackeray)

२०१९ ला भाजपाला धमकी

तोरसेकर यांनी धमक्यांचा तपशील देताना काही घडलेल्या घटनांचा दाखला दिला. ठाकरे यांनी २०१९ ची विधानसभा निवडणूक भाजपासोबत युतीमध्ये लढली आणि मुख्यमंत्री पदासाठी ‘मी दुसऱ्या टोकाला जाईन’ अशी धमकी देऊन मित्रपक्ष भाजपा आणि मतदारांशी दगा-फटका केला, असे तोरसकर यांनी म्हटले आहे. (Uddhav Thackeray)

(हेही वाचा – Budget 2024 : सर्वसामान्यांना दिलासा; विकसित भारत संकल्पनेला बळ; मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी केले अर्थसंकल्पाचे स्वागत)

मोदींची मध्यस्थी

अधिक माहिती देताना तोरसकर यांनी सांगितले की, त्यानंतर महाविकास आघाडीसोबत सरकार स्थापन करून मुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेतले. मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर त्यांना पुढील सहा महिन्यात निवडून येणे आवश्यक होते. मात्र कोरोना महामारीमुळे देशभर लॉकडाउन लागला आणि एप्रिल २०२० मध्ये होणारी विधान परिषद निवडणूक रद्द झाली. दरम्यान, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून घटनात्मक पेच सांगितला आणि मग त्यांच्या मध्यस्थीने ही निवडणूक झाली आणि त्यांचे मुख्यमंत्रीपद वाचले. (Uddhav Thackeray)

‘मविआ’ला तीच धमकी

त्यावेळी झालेल्या विधान परिषद निवडणुकीतही ११ जागा होत्या. यासाठी भाजपाने ६ उमेदवार उभे केले तर शिवसेना, आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी प्रत्येकी २-२ तर काँग्रेसने १ उमेदवार दिला होता. काँग्रेसलाही तेव्हा दूसरा उमेदवार द्यायचा होता पण तेव्हा उद्धव ठाकरे यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसला धमकी दिली काँग्रेसने दूसरा उमेदवार दिला तर ते आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील म्हणजे पर्यायाने महाविकास आघाडी सरकार कोसळेल, असे तोरसकर यांचे विश्लेषण सांगते. (Uddhav Thackeray)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.