Union Budget 2024 : केंद्र सरकारच्या लाडक्या महायुतीला अर्थसंकल्पात ठेंगा; विजय वडेट्टीवार यांची टीका

99
Union Budget 2024 : केंद्र सरकारच्या लाडक्या महायुतीला अर्थसंकल्पात ठेंगा; विजय वडेट्टीवार यांची टीका

महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या लाडक्या महायुतीचे सरकार असताना महाराष्ट्राला पर्यायाने महायुतीला अर्थसंकल्पात ठेंगा दाखविला आहे. त्यामुळे केंद्र सरकार महाराष्ट्र द्वेष्टे असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. देशात सर्वाधिक कर महाराष्ट्रातून जात असताना महाराष्ट्राला या अर्थसंकल्पातून भरीव असे काहीच मिळाले नाही. काँग्रेसच्या न्याय पत्राची उचलेगिरी अर्थसंकल्प दिसून आली आहे. अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. (Union Budget 2024)

केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी विशेष कोणतीही तरतूद केली नाही. महाराष्ट्रातील कापूस, संत्रा, धान, कांदा, सोयाबिन, दूध उत्पादक शेतकऱ्यांचा केंद्र सरकारला विसर पडल्याचे आता लपून राहिले नाही. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्प शेतकरी विरोधी असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. त्यामुळे केंद्राचे गोडवे गाणाऱ्या महायुतीने महाराष्ट्रासाठी काय आणले याचा हिशेब जनतेला द्यावा. असेही विजय वडेट्टीवार म्हणाले. (Union Budget 2024)

महाराष्ट्राच्या हातावर तुरी : अंबादास दानवे, विरोधी पक्षनेता, विधानपरिषद

अवघ्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राला देशाचा पॉवर हाउस म्हणून संबोधणाऱ्या पंतप्रधानांनी राज्यात त्यांचे सरकार असताना सर्वाधिक कर देणाऱ्या महाराष्ट्राच्या हातावर तुरी दिल्या आहेत. महाराष्ट्रप्रति पंतप्रधानांचे प्रेम हे बेगडी असल्याचे दिसून आले आहे. आज सादर केलेला अर्थसंकल्प हा देशाचा नव्हे तर बिहार आणि आंध्र प्रदेशाचा अर्थसंकल्प आहे. ५ ट्रेलियनच्या गोलच्या नावाखाली महाराष्ट्राला केंद्राने गोल-गोल फिरफून लांब फेकले आहे. इथल्या जनतेने भाजपला मतदान केले नाही, याचा वचपा आज केंद्राने काढला आहे. (Union Budget 2024)

(हेही वाचा – कारसेवकांना गोळ्या घालणाऱ्या Samajwadi Party चे खासदार मातोश्रीवर; सोशल मीडियावर टिकेची झोड)

महाराष्ट्र सर्वाधिक कर देतो हाच दोष : आदित्य ठाकरे

सरकार वाचवण्यासाठी बिहार आणि आंध्र प्रदेश सरकारला निधी दिला जात आहे, हे मी समजू शकतो. पण महाराष्ट्राचा नेमका दोष काय. महाराष्ट्र राज्य केंद्राला सर्वाधिक कर देतो. हाच महाराष्ट्राचा दोष आहे का. आम्ही राज्याला सर्वाधिक कर देतो पण अर्थसंकल्पात मात्र राज्याला काहीही मिळालेले नाही. अर्थसंकल्पात महाराष्ट्राचा एकदातरी उल्लेख केला का? भाजपा महाराष्ट्राचा एवढा तिरस्कार का करते? भाजपा महाराष्ट्राचा एवढा अपमान का करते? असे रोखठोक सवाल आदित्य ठाकरे यांनी केले आहेत. (Union Budget 2024)

धोरण आणि व्हिजन नसलेला अर्थसंकल्प : नाना पटोले

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात फक्त मोठमोठे आकडे व आकर्षक घोषणा आहेत, कोणतेही धोरण आणि व्हिजन नाही. गेल्या १० वर्षापासून मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात जनतेच्या हितापेक्षा हेडलाईन मॅनेजमेंटचीच काळजी घेतलेली दिसते. देशात आज बेरोजगारीची मोठी समस्या असताना तरुणांना पक्क्या नोकऱ्या देण्यासाठी सरकारकडे कोणतेही ठोस धोरण नाही. शेतकऱ्यांना दिलासा देणारी एकही योजना अर्थसंकल्पात दिसत नाही. महागाईने त्रस्त जनतेला दिलासा देण्यासंदर्भात तरतूद नाही, एनडीए सरकारच्या अर्थसंकल्पाने सर्व घटकांची घोर निराशा केली असून शेतकरी, महिला, तरुण, विद्यार्थी, लघु, छोटे व मध्यम उद्योगासह सर्वसामान्यांची निराशा केली आहे. सरकार टिकवण्यासाठी बिहार आणि आंध्रप्रदेशला मोठा निधी आणि महाराष्ट्राच्या तोंडाला मात्र पाने पुसली आहेत यावरून शिंदे-फडणवीस-अजित पवारांची केंद्रात काही पत नाही हे स्पष्ट झाले आहे. (Union Budget 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.