Budget 2024 : अर्थसंकल्पानंतर सोने धाडकन कोसळले!

255
Budget 2024 : अर्थसंकल्पानंतर सोने धाडकन कोसळले!
Budget 2024 : अर्थसंकल्पानंतर सोने धाडकन कोसळले!

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण (Nirmala Sitaraman) यांनी देशाचा अर्थसंकल्प (Budget 2024) सादर केला. यात मौल्यवान वस्तुंच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. त्यातच, सोन्याच्या (Gold) दरात तब्बल 5 हजार रुपयांनी कमी झाला आहे. कस्टम ड्युटी तात्काळ प्रभावाने लागू होत असते, त्यामुळे अर्थमंत्री सितारमण यांनी बजेट सादर केल्यानंतर कस्टम ड्युटी कमी करुन ग्राहकांना सुवर्णसंधीच दिली आहे. त्यानुसार, मुंबईत (Mumbai) सोन्याचे दर तब्बल 5 हजार रुपयांनी कमी झाले आहेत. तर, पुणे (Pune) आणि जळगाव शहरातही 3 हजार रुपयांनी प्रतितोळा सोने दरात घट झाल्याने ग्राहकांमध्ये आनंद पाहायला मिळत आहे. (Budget 2024)

गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचा दरात मोठी वाढ होत असल्याचे पाहायला मिळालं. त्यामुळे, ग्राहकांनी सोनं खरेदीकडे पाठ फिरवली होती. आता, दर कमी झाल्यामुळे पुन्हा सोन्याच्या दुकाना ग्राहकांची गर्दी दिसून येईल. (Budget 2024)

नेमका बदल काय? (Budget 2024) 
सोने, चांदीवरील सीमा शुल्क – 6 टक्के

प्लॅटिनमवरील सीमा शुल्क- 6.4 टक्के

अमोनिअम नायट्रेटवरील सीमा शुल्क 7 टक्क्यांवरून 10 टक्के करण्यात आले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.