- सचिन धानजी,मुंबई
मुंबईत सध्या खड्ड्यांची समस्या मोठयाप्रमाणात निर्माण झाली असून अनेक रस्त्यांच्या सुधारणा तथा विकास करण्यात आला असतानाही या खड्ड्यांची समस्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, यामध्ये रस्त्यांवरील खराब भागांमधील खड्डयांऐवजी बुजवलेल्या चरांच्या ठिकाणी खड्डे अधिक निर्माण होत आहे. त्यामुळे बुजवलेले चरांचे रुपांतर खड्ड्यांमध्ये होत असतानाही याचे काम खड्ड्यांच्या कंत्राटदारांकडून करून घेत चर बुजवणाऱ्या कंत्राटदारांना मोकळे सोडले जात असल्याचे पहायला मिळत आहे. (Potholes)
मुंबईत विविध सेवा सुविधांचे जाळे टाकण्यासाठी खोदण्यात येणाऱ्या चरी बुजवण्याच्या कामांसाठी फेब्रुवारी २०२२ रोजी ३८३ कोटी रुपयांच्या कामांसाठी स्थायी समितीने मंजुरी दिली होती. त्यासाठी प्रत्येक महापालिका परिमंडळ निहाय नियुक्त केलेल्या सात कंत्राटदारामार्फत विविध कामांसाठी खोदण्यात आलेले चर बुजवण्याची कामे केली गेली आहेत. मात्र, या कंपनीचा कालावधी तीन वर्षांचा असला तरी प्रत्यक्षात मंजूर केलेल्या कामाचा निधी आधीच संपला गेला आहे. त्यामुळे त्यासाठी अधिक २४ कोटींचा अधिक निधी वाढवून दिल्यानंतर यासाठी नव्याने निविदा मागवण्यात आल्या आहेत. मात्र, चर बुजवल्यानंतर त्याचा हमी कालावधी हा तीन वर्षांचा असता आणि त्या कालावधीमध्ये जर पुन्हा तिथे खड्डा पडल्याचे दिसून आल्यास तो बुजवून देण्याची जबाबदारी संबंधित कंत्राट कंपनीची असते. संबंधित कंपनीने बुजवलेल्या चरींच्या ठिकाणी जर खड्डा पडल्यास तो बुजववून द्यायला हवा. (Potholes)
(हेही वाचा – Union Budget 2024 : हा अर्थसंकल्प म्हणजे समृद्ध भविष्याचा मार्ग; नितीन गडकरी यांचे गौरवोद्गार)
…तर जबाबदारी महापालिकेची
यंदाच्या पावसाळ्यात अनेक ४०० किमी रस्त्यांची कामे आता हाती घेण्याची शिल्लक असून १२०० किमीचे रस्त्यांची कामे पूर्ण झालेली आहेत, तर ४०० किमी रस्त्यांची कामे प्रगती प्रथावर आहेत. त्यातील शहर भागातील निविदा रद्द झाल्याने शहर भागातील बहुतांशी रस्त्यांवर खड्डे निर्माण झाल्यास ते बुजवण्याची जबाबदारी महापालिकेची असेल. परंतु सध्या मुंबईत ज्याप्रकारे खड्ड्यांचे जाळे निर्माण होत आहे, त्यामुळे महापालिका प्रशासन टिकेचे धनी होत आहे. परंतु या खड्ड्यांमध्ये अधिक खड्डे हे बुजवलेल्या चरांच्या ठिकाणी असल्याचे पहायला मिळत आहे. (Potholes)
त्यामुळे बुजवलेल्या चरांच्या ठिकाणी खड्डे पडल्यास संबंधित कंपनीने हमी कालावधीत असेल तर ते पुन्हा बुजवून देणे आवश्यक आहे. परंतु सध्या महापालिकेने ९ मीटर पेक्षा कमी व ९ मीटर पेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी नेमलेल्या कंत्राट कंपन्यांकडून बुजवून घेतले जात आहेत. त्यामुळे खड्डे दुरुस्तीच्या खर्चाचा भार वाढत आहे. जे चर बुजवले आहेत, ते जर हमी कालावधीत असेल तर संबंधित कंत्राटदाराकडून बुजवून न देता खड्डे कंत्राटदारांकडून करून घेतल्याने एकप्रकारे महापालिकेच्या तिजोरीतून जास्तचा निधी जास्त असल्याचे दिसून येत आहे. (Potholes)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community