श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड संस्थेच्या वतीने साऱ्या भारताच्या इतिहासात छत्रपती शिवराय आणि महाराष्ट्राचे कुशल योद्धे म्हणून मराठ्यांचे असणारे अतुलनीय योगदान साऱ्या भारताने कधीही विसरता कामा नये यासाठी, खालील महत्त्वाच्या ऐतिहासिक विषयासंदर्भात राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
तलवारीच्या पात्याचा मान देण्यासाठी समन्वय साधण्याची मागणी
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या शुभ मुहूर्तावर किल्ले रायगडी होणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला देशाच्या भारतीय लष्कर, नौसेना आणि वायुसेनेच्या वतीने ‘Sword of Honour’ (तलवारीच्या पात्याचा मान) देण्याबाबत महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारशी समन्वय साधावा. छत्रपती शिवरायांच्या प्राणांचे रक्षण ज्या बांदल सेनेच्या २५० मावळ्यांनी केले, त्या शूरवीरांना ‘आषाढ शुद्ध प्रतिपदा’ या तिथीला महाराष्ट्र पोलीस दलातर्फे दरवर्षी शासकीय मानवंदना सध्याच्या ओढ्या नजिकच्या स्मारकाच्या ठिकाणी देण्यात यावी. युद्धाची तिथी/तारीख, युद्ध स्थळ निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाने तज्ज्ञांची समिती गठीत करून निर्णय घ्यावा. (Sudhir Mungantiwar)
युद्ध स्मारकास हरियाणा सरकारच्या पोलीस दलाकडून मानवंदना द्यावी
सर्व शासकीय विभाग, शासकीय पत्रव्यवहार, अध्यादेश, परिपत्रक, शाळा, महाविद्यालयातील कामकाजामध्ये ‘ स्वस्ति श्री राज्याभिषेक शके ‘ हा शिवशक लिहिणे अनिवार्य करावा. पानिपत शौर्य दिनी ‘पौष शुद्ध अष्टमी’ १४ जानेवारी १७६१ रोजी झालेल्या, काला आम येथील मराठ्यांच्या युद्ध स्मारकास हरियाणा सरकारच्या पोलीस दलाकडून मानवंदना देण्यासाठी राज्यशासनाने पाठवपुरावा करावा, तसेच ‘पौष शुद्ध अष्टमी’ या पानिपत युद्ध तिथीला महाराष्ट्र शासनाच्या वतीने कलेक्टर दर्जाच्या ऑफिसरची नियुक्ती महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुष्पहार व मानवंदनेसाठी दरवर्षी करावी. (Sudhir Mungantiwar)
Join Our WhatsApp Community