Crime : घटस्फोटाच्या कारणामुळे पतीने केला पत्नीवर अॅसिड हल्ला, पत्नीसह मुलगा भाजला

157
Crime : घटस्फोटाच्या कारणामुळे पतीने केला पत्नीवर अॅसिड हल्ला, पत्नीसह मुलगा भाजला

घटस्फोटामुळे संतापलेल्या पतीने पत्नीवर अॅसिड हल्ला केल्याची खळबळजनक घटना वांद्रे पूर्व येथे घडली. या अॅसिड हल्ल्यात पत्नी आणि १२ वर्षाचा मुलगा गंभीररीत्या भाजला असून दोघांना उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी निर्मल नगर पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले असता २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे (पूर्व) येथील बेहरामपाडा येथे राहणारा आरोपी इशरत शेख (४०) हा ऑटोरिक्षा चालक आहे. इशरत शेख याला पहिल्या पत्नीपासून बारा वर्षांचा मुलगा असून सहा वर्षांपूर्वी इशरत याचे अंजुम सोबत लग्न झाले होते. अंजुम केटरिंगचे काम करते, मागील दोन वर्षांपासून इशरत आणि अंजुम यांच्यात काही मुद्द्यांवरून भांडण सुरू होते. अंजुमने वांद्र्यातील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाची केस दाखल केली होती. पाच दिवसांपूर्वी वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने त्यांच्या घटस्फोटाच्या याचिकेवर निकाल दिला होता. मात्र इशरतला तिच्यापासून घटस्फोट नको असल्याने तो नाखूश होता असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. (Crime)

(हेही वाचा – MCA Election : अजिंक्य नाईक मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नवे अध्यक्ष)

सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास अंजुम ही दारात सावत्र मुलासह बसलेली होती. त्यावेळी इशरतचा हातात एक डब्बा घेऊन अंजुमकडे आला व त्याने रागाने तिला म्हणाला की, “जर तू माझी होऊ शकत नाही, तर तुला दुसऱ्याची होऊ देणार नाही, असे बोलून त्याने सोबत आणलेल्या अॅसिडचा डब्बा अंजुमच्या अंगावर ओतला, या अॅसिड हल्ल्यात अंजुम आणि बारा वर्षांचा मुलगा हे दोघे जखमी झाले, या अॅसिड हल्ल्यानंतर इशरत याने घटनास्थळावरून पळ काढला. (Crime)

त्यांचा आरडाओरडा ऐकून शेजारी जमा झाले आणि त्यांनी त्यांना भाभा रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांची प्रकृती आणि भाजलेली जखम पाहता दोघांनाही चिंचपोकळी, सात रस्ता येथील कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले. आता दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. “आम्ही इशरतविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणात त्याला शोधून अटक करण्यात आली आहे. तिला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता २५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली, आहे अशी माहिती निर्मल नगर पोलीस ठाण्याचे वपोनि. श्रीमंत शिंदे यांनी दिली. (Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.