India’s Tour of Sri Lanka : गौतम गंभीरचा पहिल्यांदाच भारतीय संघाबरोबर सराव, संजू सॅमसनला दिले फलंदाजीचे धडे 

147
India’s Tour of Sri Lanka : गौतम गंभीरचा पहिल्यांदाच भारतीय संघाबरोबर सराव, संजू सॅमसनला दिले फलंदाजीचे धडे 
India’s Tour of Sri Lanka : गौतम गंभीरचा पहिल्यांदाच भारतीय संघाबरोबर सराव, संजू सॅमसनला दिले फलंदाजीचे धडे 
  • ऋजुता लुकतुके

प्रशिक्षक गौतम गंभीरला नियुक्ती झाल्यापासून वेळ दवडायचा नाहीए. त्यामुळेच त्याने प्रशिक्षक म्हणून आपलं काम श्रीलंकेत पोहोचल्या पोहोचल्या सुरू केलं आहे. भारतीय संघाबरोबरचं पहिलं सराव शिबीर मंगळवारी पार पडलं. बीसीसीआयने लागलीच गंभीरचा सरावातील व्हीडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. ‘मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर पदभार स्वीकारताना,’ असा मथळा या व्हीडिओला देण्यात आला आहे. बीसीसीआय बरोबरत या मालिकेचं थेट प्रसारण दाखवणाऱ्या क्रीडा वाहिनीनेही भारतीय संघाचे व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (India’s Tour of Sri Lanka)

(हेही वाचा- India’s Tour of Sri Lanka : भारतीय संघाची मुंबई – कोलंबो – पल्लेकल अशी मजल दरमजल )

यात गंभीर कर्णधार सूर्यकुमार (Suryakumar) आणि उपकर्णधार शुभमन यांच्याबरोबर चर्चा करताना दिसतो. तर संजू सॅमसन (Sanju Samson) बरोबर तो फलंदाजी करतानाही दिसतो. सूर्यकुमारनेही (Suryakumar) फिरकीपटू अक्षरबरोबर वेळ घालवला. पल्लेकल इथं खेळपट्टीकडून फिरकीलाच साथ मिळेल असा अंदाज आहे. तसं दिसलं तर सूर्यकुमार चौथ्या षटकातच अक्षरचा वापर करू शकतो. (India’s Tour of Sri Lanka)

 या दौऱ्यात निवड समितीने दोन महत्त्वाचे निर्णय घेतले. रोहीतच्या निवृत्तीनंतर टी-२० प्रकारातील कप्तानी हार्दिक ऐवजी सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे. तर उपकर्णधार म्हणूनही शुभमन गिलवर (Shubman) विश्वास दाखवला आहे. निदान टी-२० प्रकारात शुभमन यशस्वी जायसवालबरोबर (Yashasvi Jaiswal) सलामीला येऊ शकतो.  (India’s Tour of Sri Lanka)

(हेही वाचा- Murlidhar Mohol On Union Budget : मोदी सरकारचा पुण्यासाठी निधीचा ओघ यंदाही; मुरलीधर मोहोळ यांनी केलं स्वागत)

तर रियान पराग (Riyan Parag) आणि रिंकू सिंग (Rinku Singh) यांनाही संघात स्थान पक्क करण्याची संधी मिळणार आहे. वॉशिंग्टन सुंदरसाठीही (Washington Sundar) ही मोठी संधी असेल. टी-२० सामने २७, २८ आणि ३० जुलैला पल्लेकल इथंच होतील.  (India’s Tour of Sri Lanka)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.