Union Budget 2024 : क्रीडा क्षेत्रासाठी २,४४२ कोटी रुपयांची तरतूद

114
Union Budget 2024 : क्रीडा क्षेत्रासाठी २,४४२ कोटी रुपयांची तरतूद
Union Budget 2024 : क्रीडा क्षेत्रासाठी २,४४२ कोटी रुपयांची तरतूद
  • ऋजुता लुकतुके

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी देशाचा आर्थसंकल्प मांडताना क्रीडा क्षेत्रासाठी गेल्यावर्षीच्या तुलनेत ४३ कोटी रुपये वाढवले. एकूण ३,४४२ कोटी रुपयांची तरतूद करताना त्यांनी एकच्या खेलो इंडियला ९०० कोटी दिले आहेत. क्रीडा क्षेत्रात मूलभूत विकासावर भर देण्यात आला हे उघड आहे. गेल्यावर्षी खेलो इंडियासाठी ८८० कोटी रुपये देण्यात आले होते. (Union Budget 2024)

(हेही वाचा- Murlidhar Mohol On Union Budget : मोदी सरकारचा पुण्यासाठी निधीचा ओघ यंदाही; मुरलीधर मोहोळ यांनी केलं स्वागत)

ऑगस्ट महिन्यात पॅरिस ऑलिम्पिक संपेल. त्याचबरोबर ऑलिम्पिक चक्रही संपुष्टात येईल. तसंच आशियाई आणि राष्ट्रकूल या इतर महत्त्वाच्या स्पर्धाही २-३ वर्षं दूर आहेत. असं असताना क्रीडा क्षेत्रासाठीची तरतूद वाढवल्यामुळे आनंद व्यक्त होत आहे. यंदा अर्थ मंत्रालयाने ४५ कोटी रुपयांची तरतूद वाढवली आहे. (Union Budget 2024)

खासकरून खेलो इंडियावर अर्थमंत्र्यांचं विशेष लक्ष आहे. देशातील क्रीडा नैपुण्य शालेय स्तरावर शोधून काढून राष्ट्रीय स्तरासाठी खेळाडू तयार करणं हे खेलो इंडियाचं महत्त्वाचं काम आहे. त्यामुळे खेलो इंडिया बरोबरच खेलो युथ इंडिया सारखा उपक्रमही यंदा सुरू करण्यात आला. कौशल्याचा शोध आणि विकास ही या उपक्रमाची उद्दिष्टं आहेत. २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात खेलो इंडियासाठी सुरुवातीला १,००० कोटी रुपयांची तरतूद झाली होती. नंतर ती बदलून ८८० कोटी इतकी करण्यात आली.  (Union Budget 2024)

(हेही वाचा- India’s Tour of Sri Lanka : गौतम गंभीरचा पहिल्यांदाच भारतीय संघाबरोबर सराव, संजू सॅमसनला दिले फलंदाजीचे धडे )

२०१८ मध्ये खेलो इंडिया गेम्सना सुरुवात झाल्यापासून सरकारने या उपक्रमाकडे गांभीर्याने पाहिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी स्पर्धेच्या उद्घाटनाला हजर राहिले आहेत. गेल्यावर्षी २०२३ मध्ये खेलो इंडियात पॅरालिम्पिकचाही समावेश करण्यात आला आहे. तर २०२० मध्ये खेलो इंडिया विद्यापीठ गेम्स आणि विंटर गेम्सही सुरू झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू पुढे यावेत यासाठी हा मूलभूत प्रयत्न आहे. (Union Budget 2024)

शालेय स्तरावरील खेळाडूंवर लक्ष रहावं यासाठी खेलो इंडिया स्पोर्ट्स एक्सलेन्स केंद्रही जिल्हा स्तरावर उभारण्यात आली आहेत. (Union Budget 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.