बेळगावात (Belgaon) गोकाक तालुक्यात स्कूल बसचा (School Bus Accident) भीषण अपघात झाला आहे. स्कूल बस उलटल्याने सहा विद्यार्थी गंभीर जखमी झाली आहेत. तर काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. बसचं स्टेअरींग लॉक झाल्यानं अपघात झाला. जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरु आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
(हेही वाचा –Indian Football Team : भारतातील सगळ्यात श्रीमंत, यशस्वी फुटबॉल संघ कुठला?)
गोकाक तालुक्यातील गोकाक पाच्छापूर मार्गावरील मेलीमर्डी क्रॉस येथे सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. मावनूर,गोडचीनमलकी आणि मेलमट्टी या गावातील विद्यार्थ्यांना घेऊन स्कूल बस मरडीमठ गावाकडे निघाली होती.बसचे स्टेरिंग लॉक झाल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. (School Bus Accident)
(हेही वाचा –Manoj Jarange यांच्याविरोधात अटक वॉरंट; काय आहे प्रकरण ?)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी गोकाक येथील इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. बस उलटल्याने सर्वच विद्यार्थी भयभीत झाले. मात्र तातडीने सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित खाली उतरवले आहे. अपघातात काही विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. तर सहा विद्यार्थी गंभीर जखमी झाले. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. बसचे स्टेअरिंग लॉक झाल्याने बस उलटल्याची माहिती समोर आली आहे. (School Bus Accident)
हेही पहा –