Bangladeshi infiltrators च्या जामिनासाठी स्थानिकांच्या आधारकार्डचा वापर; पुण्यात तक्रार दाखल

164
Bangladeshi infiltrators च्या जामिनासाठी स्थानिकांच्या आधारकार्डचा वापर; पुण्यात तक्रार दाखल
Bangladeshi infiltrators च्या जामिनासाठी स्थानिकांच्या आधारकार्डचा वापर; पुण्यात तक्रार दाखल

निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या पाच घुसखोरांच्या सुटकेसाठी पिंपरी न्यायालयात बनावट जामीन देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी राहुल बबन बनसोडे (वय ३४, रा. लांडेवाडी पोलीस चौकी शेजारी, विठ्ठलनगर, भोसरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मी न्यायालयात उपस्थित नसतांनाही माझ्या आधारकार्डचा वापर बांगलादेशी घुसखोरांना सोडवण्यासाठी करण्यात आला आहे, असे बनसोडे यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी वकिलासह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Bangladeshi infiltrators)

(हेही वाचा- Andy Murray : पॅरिस ऑलिम्पिक ही अँडी मरेची शेवटची व्यावसायिक स्पर्धा?)

वकिल आणि नातेवाईकांवर गुन्हा दाखल

त्यानुसार आरोपीला जामीन देण्यासाठी हजर असलेले वकील आणि आरोपीच्या जामिनासाठी वकिलाच्या संपर्कात असलेले नातेवाईक आणि मित्र यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. ही घटना ३० एप्रिल रोजी सकाळी साडेदहा ते सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, पिंपरी न्यायालय येथे घडली. त्यानंतर बनसोडे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. (Bangladeshi infiltrators)

पाच बांगलादेशी नागरिकांना निगडी पोलिसांनी अटक केली होती. या आरोपींच्या सुटकेसाठी स्थानिक रहिवासी असणारा जामीनदार द्यायचा होता. मात्र जामीन देण्यासाठी उपस्थित असलेल्या वकिलासह इतर आरोपींनी बनसोडे हे स्वतः न्यायालयात हजर नसतानाही त्यांच्या आधारकार्डाचा वापर करीत आरोपींना जामीन देऊन न्यायालय व फिर्यादी यांची दिशाभूल करुन फसवणूक केली. पिंपरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.  (Bangladeshi infiltrators)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.