पहिलीच्या बालभारती पुस्तकातील एका कवितेत हिंदी व इंग्रजी शब्द वापरण्यात आल्याने वादंग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित कवितेतील वन्समोअर शब्द तपासण्याचे आदेश अभ्यास गटाच्या समितीला दिल्याची माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तसेच सर्रास वापरात येणाऱ्या लहान गोष्टींचा बाऊ करू नका, असे सांगत कवितेतील शब्दांची केसरकर यांनी पाठराखण केली. (Marathi Poem Controversy)
बालभारतीच्या इयत्ता पहिलीच्या मराठी पुस्तकातील जंगल मैफल ठरली या कवितेतील यमक जुळविण्यासाठी हिंदी, मराठी शब्द घुसवले आहेत. विविध तज्ज्ञांनी या कवितेवर आक्षेप घेत, मते मांडली आहेत. तसेच सर्वच क्षेत्रात कवितेवर टीकेची झोड उठली आहे. बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी निवड समितीकडून मान्यता मिळाल्यानंतर एखादी कविता किंवा लेख अभ्यासक्रमात समाविष्ट केला जातो. तसेच त्रयस्थ व्यक्तींकडूनही त्याची तपासणी केली जाते. ही सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर संंबंधित कविता समाविष्ट केली होती. अद्याप त्यावर कुणीही आक्षेप घेतला नव्हता, असा खुलासा केला होता. शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी मात्र यावर सारवासारव केली. मराठी भाषेत अनेक इंग्रजी शब्द सर्रास वापरले जातात. वन्समोअर शब्द देखील पुन्हा एकदा या शब्दासाठी वापरला असावा. परंतु, सध्या वाद सुरू झाल्याने या कवितेबाबत अभ्यास गटाच्या समितीकडे प्रस्ताव पाठवून त्यावर निर्णय घेण्याच्या सूचना दिल्याची माहिती, केसरकर यांनी दिली. तसेच साहित्यिक व तज्ज्ञांशी चर्चा करून रुढ शब्दांची खात्री करा मगच वापरा, अशा सूचना दिल्या. (Marathi Poem Controversy)
(हेही वाचा – स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने Kargil Victory Day निमित्त’गाथा पराक्रमाची’ कार्यक्रमाचे आयोजन)
लहान गोष्टीचा बाऊ किती करायचा
गेल्या १८ वर्षापासून मराठी भाषेचे धोरण आले नव्हते. कोणाला त्यावेळी मराठीचा कळवळा आला नव्हता. आता सरकारने मराठी भाषेचे धोरण आखले आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयात मराठी बोलणे सक्तीचे केले आहे. मराठीचा अभिमान आहे. परंतु, एखाद्या कवितेत इंग्रजी शब्द आला असेल आणि तो रुढ झालेला असेल तर काय हरकत आहे? काही शब्द रुढ झाले आहेत. मुलांना देखील त्या शब्दांची सवय झाली आहे. मात्र, लहान गोष्टीचा किती बाऊ करायचा? प्रत्येकाला याचे भान असायला हवे, असा टोला लगावत कवितेतील शब्दांची केसरकर यांनी पाठराखण केली. (Marathi Poem Controversy)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community