Shyam Manav : “निवडणूक आली आणि श्याम मानव यांना जाग आली”, केशव उपाध्ये यांचा पलटवार

148
Shyam Manav :
Shyam Manav : "निवडणूक आली आणि श्याम मानव यांना जाग आली", केशव उपाध्ये यांचा पलटवार

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खोट्या प्रकरणांत तुरुंगात डांबण्याचा डाव होता. पण तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंबंधीच्या एका प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्यामुळे हे दोघे वाचले. नंतर या प्रकरणांत देशमुखांवरच तुरुंगात जाण्याची वेळ आली, असा खळबळजनक दावा अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव (Shyam Manav) यांनी केला. यावर आता भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhyay) यांनी पलटवार केला आहे.

एका पोस्टच्या माध्यमातून श्याम मानव यांच्यावर पलटवार केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘ श्याम मानव यांच्या बाबत असणाऱ्या अंधश्रद्धांचे आज खऱ्या अर्थाने निर्मूलन झाले आहे. यांना अचानक आत्ता कशी जाग आली ? निवडणूक जवळ आल्यामुळे ? त्यांनी सांगितलेल्या गोष्टी खऱ्या असतील तर त्यावेळीच का नाहीत बोलले ?’ (Shyam Manav)

‘या देशात कायद्याचे राज्य आहे आणि या देशातली न्यायव्यवस्था एवढी कमकुवत नक्कीच नाही… 100 कोटींची वसुली करणारे अनिल देशमुख तुम्हाला आज हिरो वाटत आहेत ? किल्ली दिलेल्या बाहुल्यासारखे आज अचानक ते येऊन बोलले. पण यातली एक किल्ली मातोश्री वरून आणि दुसरी बारामती वरून फिरवली गेली आहे? हे कळण्याइतपत महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे.’ अशी टीका देखील केशव उपाध्ये यांनी केली आहे. (Shyam Manav)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.