Shah-Pawar Meeting : अजित पवार-अमित शाह भेटीत जागावाटप, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा

174
Shah-Pawar Meeting : अजित पवार-अमित शाह भेटीत जागावाटप, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी भाजपा नेते, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांची गेल्या चार दिवसांत दोन वेळा भेट घेतली. पवार यांच्यावर पक्षातून विधानसभा जागावाटपासाठी प्रचंड दबाव असल्याने पवार यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे पवार-शाह भेटीत विधानसभा जागावाटप आणि राज्य मंत्रिमंडळ विस्तार यावर चर्चा झाल्याचे समजते. (Shah-Pawar Meeting)

काही शरद पवार यांच्याकडे जाण्यास इच्छुक

लोकसभेचा अनुभव वाईट आल्याने विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांच्यावर त्यांच्याच पक्षातील नेत्यांकडून जागावाटप लवकरात लवकर करण्यासाठी दबाव वाढत असून किमान ८०-९० जागा पदरात पडून घेण्याचा आग्रह होत आहे. एकीकडे काही आमदार शरद पवार यांच्या गटात जाण्यासाठी इच्छुक असल्याने पवार यांच्यावर आमदारांचा विधानसभा मतदार संघ सुरक्षित राहावा, यासाठीही आग्रह धरला जात आहे. जागावाटपावर शाह-पवार यांची चर्चा झाली मात्र अद्याप या चर्चेला मूर्त रुप आले नाही, असे कळते. तसेच अंतिम निर्णय राज्यातील भाजपा नेत्यांना विचारूनच घेतला जाईल, असे आश्वासन शाह यांनी दिल्याचे समजते. (Shah-Pawar Meeting)

(हेही वाचा – Parliament Session : महाविकास आघाडीची एकजुटता फक्त दिखावा? संसदेत फुटला फुगा)

मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा

अजित पवार यांच्यासोबत आलेले काही तथाकथित दिग्गज नेते पुन्हा शरद पवार यांच्या गटात जातील, या भीतीने अजित पवार अस्वस्थ झाले असल्याचे बोलले जात आहे. गेल्या चार दिवसांत पवार यांनी शाह यांची दोन वेळा भेट झाली असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. गेल्या शनिवारी आणि रविवारी (२०-२१ जुलै) असे दोन दिवस भाजपाचे अधिवेशन पुण्यात होते. त्यावेळी पवार यांनी शाह यांची एका खासगी हॉटेलमध्ये भेट घेऊन चर्चा केली. या भेटीत गेली अनेक महीने रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारासह आगामी विधानसभा निवडणुकीबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे. (Shah-Pawar Meeting)

६०-६५ जागा मिळण्याची शक्यता

मुळात भाजपा राज्यातील २८८ पैकी १५० पेक्षा कमी जागा लढवण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे उर्वरित १३८ जागांवर अन्य मित्रपक्षांना सांभाळून घेणे ही भाजपासाठी तारेवरची कसरत आहे. जागांचा विचार करता शिवसेना (शिंदे) ६५-७०, अजित पवार यांची राष्ट्रवाई ६०-६५ तसेच अन्य घटक पक्षांना ५-७ जागांवर समाधान मानावे लागेल, अशी चिन्हे आहेत. (Shah-Pawar Meeting)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.