Hindustan Post Impact : गोल देऊळासमोरील मलवाहिनीची तातडीने महापालिकेने केली सफाई, वाहत्या मल मिश्रित पाण्याचा प्रवाह थांबला

557
Hindustan Post Impact : गोल देऊळासमोरील मलवाहिनीची तातडीने महापालिकेने केली सफाई, वाहत्या मल मिश्रित पाण्याचा प्रवाह थांबला
Hindustan Post Impact : गोल देऊळासमोरील मलवाहिनीची तातडीने महापालिकेने केली सफाई, वाहत्या मल मिश्रित पाण्याचा प्रवाह थांबला

विशेष प्रतिनिधी,मुंबई

दादर (Dadar) पश्चिम येथील गोल हनुमान मंदिरासमोरील मलवाहिनीतील मल बाहेर वाहून जात असताना महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे वृत्त हिंदुस्थान पोस्टने प्रसिध्द केल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये त्याठिकाणी मलनि:सारण वाहिनीतील मल शोषून घेणाऱ्या वाहनाद्वारे या वाहिनीतील साचलेला  मल तातडीने साफ करण्यात आला. त्यामुळे या वाहिनीतील वाहणारे मलमिश्रित पाण्याची समस्या तात्पुरती मिटली असली तरी या मलवाहिनीला जोडणाऱ्या मॅनहोल्सचे बांधकामच अंतर्भागात तुटलेला असल्याने याचे कायमस्वरुपी काम करण्याची गरज असून  वाहतूक पोलिसांची परवानगी न मिळाल्याने याचे काम करता येत नसल्याचे बोलले जात आहे. (Hindustan Post Impact)

(हेही वाचा- Dadar च्या गोल देवळासमोरच वाहते मलमिश्रित पाणी)

दादरच्या गोल देऊळासमोरच (Gol Deul) वाहते मलमिश्रित पाणी या मथळ्या खाली हिंदुस्थान पोस्टने (Hindustan Post Impact) बुधवारी वृत्त प्रकाशित केले होते. दादर पश्चिम येथील गोल देऊळा समोरील भागातच मागील अनेक दिवसांपासून मलनि:सारण वाहिनीतील मल मिश्रित पाणी रस्त्यावर वाहत असतानाही याकडे लक्ष दिले जात नाही. विशेष म्हणजे या वाहत्या पाण्यामुळे एकप्रकारची दुर्गंधीही पसरली  असून याच पाण्यातून नागरिकांना जावे लागत आहे. मंदिरासमोरील मलमिश्रित पाणी वाहत असतानाही महापालिकेच्या एकाही अधिकाऱ्याला ओसंडून वाहणारा मॅनहोल्स साफ स्वच्छ करावा असे वाटत नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे अशा प्रकारचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर महापालिका अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ  अश्विनी जोशी (Ashwini Joshi) यांनी मलनि:सारण प्रचालन विभागाला निर्देश देत तातडीने मलनि:सारण वाहिनीतील गाळ साफ करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, बुधवारी सायंकाळी ७ वाजता याठिकाणी मल शोषून घेणारे वाहनासह(संक्शन व्हेहीकल) कर्मचारी तिथे पोहोचले आणि त्यांनी तुंबलेली मलवाहिनी साफ केली. त्यामुळे वाहणाऱ्या मलमिश्रित पाण्याचा प्रवाह थांबला गेला आहे. (Hindustan Post Impact)

Untitled design 2024 07 25T080247.361

(हेही वाचा- Chatrapati Shivaji Maharaj Statue: अफझलखानाचा कोथळा बाहेर काढतानाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा तयार; पहा व्हिडीओ)

येथील दुकानदारांच्या म्हणण्यानुसार, जरी या मॅनहोल साफ केले तरी काही दिवसांमध्ये ते भरुन पुन्हा वाहू लागते. त्यामुळे यावर कायमस्वरुपी तोडगा काढायला हवा असे येथील दुकानदारांचे म्हणणे आहे. तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मलवाहिनी आणि मॅनहोल्स हे अंतर्गत भागात तुटलेले आहे, परिणामी ही समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे मलनि:सारण प्रचलन विभागाच्यावतीने याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तयार केला आहे. परंतु याला वाहतूक पोलिसांची परवानगी मिळत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (Hindustan Post Impact)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.