महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पासाठी 15,554 कोटी Ashwini Vaishnaw यांची माहिती 

141
आता 70 वर्षांवरील सर्वांसाठी आयुष्यमान कार्ड - Ashwini Vaishnav
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पाचा विकास वेगाने व्हावा यासाठी 15554 कोटीची भरीव तरतूद केली आहे. संपुआ सरकारच्या काळात महाराष्ट्राला नाहीच्या बरोबर आर्थिक मदत केली जात होती. मात्र, मोदी यांनी महाराष्ट्रवार विशेष लक्ष दिले आहे. (Ashwini Vaishnaw)
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी काल बुधवारी महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील पत्रकारांशी रेल्वे भवनात संवाद साधला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प सादर केला. बजेट मध्ये महाराष्ट्रसाठी तरतूद केली. परंतू, याबाबत आपल्या भाषणात काहीही उल्लेख केला नाही.
काँग्रेससह विरोधी पक्षाच्या खासदारांनी याचाच फायदा उचलला आणि मोदी सरकारने महाराष्ट्रासाठी काहीही तरतूद केली नाही अशी अफवा पसरविली. यामुळे भाजपाला बॅकफूट वर यावे लागले. (Ashwini Vaishnaw)
मात्र, अश्विनी वैष्णव यांनी विरोधकांच्या फुग्यातील हवा एका झटक्यातच काढली. मोदी सरकारने महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्प पुर्ण करण्यासाठी जवळपास 16 हजार कोटीची तरतूद अर्थसंकल्पत केली असल्याचे पत्रकारांना सांगितले. (Ashwini Vaishnaw)
महाराष्ट्र रेल्वे अर्थसंकल्प: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी गुरुवारी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 मध्ये महाराष्ट्राच्या रेल्वे प्रकल्पांसाठी 15,554 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर मुंबई महानगरातील रेल्वे प्रकल्पासाठी मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प (MUTP) अंतर्गत 789 कोटी रुपये देण्याची तरतूद आहे. (Ashwini Vaishnaw)
रेल्वे मंत्री  वैष्णव यांनी सांगितले की, येत्या पाच वर्षात मुंबई उपनगरात 250 नवीन गाड्या चालविल्या जाणार आहेत.
  • बुलेट ट्रेनसाठी ३० हजार कोटी
“मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पासाठी ३० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे,” असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. “या प्रकल्पाला दोन्ही राज्य सरकारे मदत करत आहेत. ५०८ किमी लांबीचा बुलेट प्रकल्प आगामी काळात प्रकल्पातील शहरांचा विकास दुप्पट करेल. सध्या व्हायाडक्टचे काम सुरू असून ते खूपच आव्हानात्मक आहे,” असे रेल्वेमंत्री म्हणाले. (Ashwini Vaishnaw)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.