महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत २५ जुलै रोजी जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबई, पुणे, रायगड व सिंधुदुर्गसह बहुतांश जिल्ह्यांत पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने पुढील काही तासांत पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात रेड अलर्ट अर्थात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या भागातील शाळांना सुटी घोषित केली आहे. लवासामध्येही दरड कोसळली आहे. (Landslide in Lavasa)
(हेही वाचा – Vihar Lake ही भरले, मुंबईकरांनो आता तुमची काही खैर नाही! )
मुळशी तालुक्यात असलेल्या लवासामध्ये दोन व्हिलांवर दरड कोसळली आहे. मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाल्याने हे दोन्ही व्हिला गाडले गेले आहेत. या व्हिलांमध्ये तीन ते चार लोक रहात असल्याची माहिती देखील समोर येत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी माहिती दिली आहे. या संदर्भातील व्हिडिओ देखील समोर आला आहे.
मावळ आणि मुळशीमधील सर्व पर्यटनस्थळे पुढील 4 दिवस बंद राहणार आहेत. मावळ आणि मुळशी भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रशासनाचा निर्णय घेतला आहे.
व्हिलामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरु
स्थानिक नागरिकांकडून या व्हिलांमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मुळशी तालुक्याच्या गाठ परिसरामध्ये अनेक नागरिक पर्यटनासाठी देखील येत आहेत. मात्र, या भागात पावसाचा जोर वाढल्याने सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध लवासा सिटी परिसरात अनेक पर्यटक पर्यटनासाठी येतात. मात्र, ही घटना घडल्याने घराच्या बाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Landslide in Lavasa)
हेही पहा –