- ऋजुता लुकतुके
जागतिक स्तरावर देशाचं प्रतिनिधित्व करणं हा खेळाडूंसाठी सर्वोच्च मान आहे. त्यातही चार वर्षांतून एकदा येणारं ऑलिम्पिक खेळता आलं तर आकाश ठेंगणं होतं. यंदा ११७ खेळाडूंना ती संधी मिळणार आहे. २६ जुलैपासून फ्रान्सची राजधानी पॅरिस इथं ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात होत आहे. ३१९ सुवर्ण पदकांसाठी १५,००० च्या वर खेळाडू एकमेकांशी झुंज देणार आहेत. ३ वर्षांपूर्वी झालेल्या टोकयो ऑलिम्पिकमध्ये भारताने १ सुवर्ण, २ रौप्य आणि ४ कांस्य अशी एकूण ७ पदकं जिंकली होती. हा आकडा पार करून यंदा दुहेरी आकडा गाठण्याच्या इराद्याने भारतीय पथक पॅरिसला दाखल झालं आहे. (Paris Olympic 2024)
(हेही वाचा- Pune Rain : पुण्यातील सोसायट्यांमध्ये का चालवाव्या लागल्या बोटी ? Ajit Pawar म्हणाले…)
२३ वर्षीय श्रीहरी नटराज (Srihari Nataraj) या जलतरणपटूचं हे दुसरं ऑलिम्पिक आहे. पॅरिसला रवाना होण्यापूर्वी प्रत्येक खेळाडूला जी उत्सुकता असते ती नटराजलाही होती. त्याला भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनक़डून मिळालेलं भारताचं किट त्याला पाहायचं होतं. ते उघडतानाचा व्हीडिओच त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. (Paris Olympic 2024)
नटराज या व्हीडिओत दोन सुटकेस उघडताना दिसतो. यात उद्घाटन समारंभात घालायचा गणवेश तसंच जर्सी, बूट आणि इतर अनेक गोष्टी आहेत. हा व्हीडिओ प्रत्यक्ष पाहूया, (Paris Olympic 2024)
View this post on Instagram
टोकयो ऑलिम्पिकमध्ये श्रीहरी नटराज १०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात सहभागी झाला होता. आताही तो हाच प्रकार खेळणार आहे. त्याला ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश मिळाला नाही. पण, सर्वसमावेशकता निकषावर त्याला मुख्य स्पर्धेत स्थान मिळालं आहे. या अंतर्गत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषद त्या त्या देशाच्या मध्यवर्ती क्रीडा संघटनेला आपले सर्वोत्तम दोन खेळाडू ऑलिम्पिकमध्ये खेळवण्यासाठी पाचारण करते. (Paris Olympic 2024)
(हेही वाचा- मुंबईला पाणीपुरवठा करणारे Modaksagar Dam ही भरले)
त्या निकषावर श्रीहरीला संधी मिळाली आहे. जलतरण खेळात तशीही भारतीयांनी आतापर्यंत समाधानकारक कामगिरी केलेली नाही. श्रीहरीकडून अपेक्षा आहे ती ५३.७७ सेकंदांची वेयक्तिक कामगिरी उंचावून उपान्त्य फेरीपर्यंत पोहोचण्याची. (Paris Olympic 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community